Friday, March 29, 2024

काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेसमध्ये शहनाझ गिलने केला कहर, चाहते म्हणाले ‘सिंहिणी परत…’

अभिनेत्री-गायिका आणि बिग बॉस १३ फेम शहनाझ गिलला पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शहनाझने सोशल मीडियापासून काही अंतर निर्माण केले होते. मात्र आता शहनाझ पुन्हा एकदा सोशल मीडियावर परतली असून, तिच्या पोस्टने पुन्हा एकदा चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत आहे. नुकतेच तिने तिचे लेटेस्ट फोटोशूट शेअर करून इंटरनेटचा पारा चढवला आहे.

सिद्धार्थच्या (Sidharth Shukla) मृत्यूनंतर चाहत्यांना तिच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहण्याची इच्छा आहे. ज्याने चाहत्यांना तिच्याबद्दल वेड लावले होते. शहनाझने (Shehnaaz Gill) हळूहळू स्वतःची काळजी घेतली आणि आता ती पुन्हा कामावर परतत आहे. शहनाझने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. जे पाहून चाहत्यांनी अंदाज लावला आहे की, ती ग्लॅमरच्या दुनियेवर अधिराज्य गाजवायला तयार आहे. शहनाझने तिच्या सोशल मीडिया अकाऊंवर नवीन फोटोशूटचे काही जबरदस्त फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये शहनाझ काळ्या रंगाच्या स्टायलिश शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे.

काळ्या ड्रेसवर हिरव्या पंखांची डिझाईन शहनाझच्या आऊटफिटमध्ये आकर्षण आणि ग्लॅमर जोडताना दिसत आहे. शहनाझने एकापाठोपाठ एक ९ फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. प्रत्येक फोटो तिचा हावभाव, अंदाज, स्टाईल आणि एटीट्यूड दिसत आहे. न्यूड मेकअपमधील शहनाझचा लूक आणि फिकट गुलाबी रंगाची लिपस्टिक प्रचंड सुंदर दिसत आहे. शहनाझने छोट्या इअर रिंग्सने तिची स्टाईल पूर्ण केली आहे. तिने केस वरती बांधले आहेत.

फोटो शेअर होऊन फार काळ लोटला नाही की, चाहते तिच्या फोटोंवर जोरदार प्रेमाचा वर्षाव करत आहेत. तिच्या पुनरागमनामुळे चाहते खूश आहेत आणि कमेंट करून तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. एका युजरने लिहिले की, “वाह… सिंहीण परत आली आहे.” दुसर्‍याने लिहिले की, “पण ते हसू अजूनही हरवले आहे.” आणखी एका युजरने लिहिले की, “दिन बना दिया शहनाझ.” त्यासह अनेक चाहते हार्ट आणि फायर इमोजी बनवून प्रेम व्यक्त करत आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा