पडद्यावर कलाकार जी भूमिका किंवा जशा पद्धतीची भूमिका साकारतात तसेच ते त्यांच्या खऱ्या आयुष्यात असतील असे देखील अजिबात नाही. शिवाय कलाकार हे त्यांच्या सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये जसे दिसतात तसेच कायम दिसतात असे नाही. काळानुसार त्यांच्यामध्ये देखील मोठे बदल घडताना दिसतात. बालकलाकार मोठे होऊन मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येतात. काही कलाकार त्यांच्यात काही बदल करून घेतात. एकुणच काय तर कलाकारांमध्ये बऱ्याचदा आपल्याला बदल होताना दिसतात.
आता शाहिद कपूर आणि अमृता राव यांचा सुपरहिट ‘विवाह’ सिनेमा तुम्हाला आठवतच असेल. हा सिनेमा आणि यातील गाणी तुफान हिट झाली होती. आजही हा चित्रपट टीव्हीवर मोठ्या आवडीने पाहिला जातो. याच सिनेमात अमृता रावच्या लहान बहिणीची छुटकीची भूमिका साकारणारी मुलगी तुम्हाला आठवतच असेल जराशी सावळी आणि बबली असणारी ही छुटकी सिनेमात भलताच भाव खाऊन गेली. अमृता आणि छुटकी ही जोडी देखील प्रेक्षकांना खूप आवडली. ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अमृता प्रकाशमध्ये आता मोठा बदल झाला आहे. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आता तब्बल १५ वर्ष झाले, या एवढ्या वर्षांमध्ये अमृताचा चेहरा मोहरा चांगलाच बदलला आहे. तिचा नवीन लूक पाहून सर्वच फॅन हैराण होताना दिसतात.
अभिनेत्री अमृता प्रकाशचे काही फोटो नुकतेच इंटरनेटवर व्हायरल झाले आणि अमृता पुन्हा प्रकाशझोतात आली. अमृताच्या लेटेस्ट बोल्ड आणि स्टायलिश फोटोंमुळे तिच्या फॅन्सला ती विवाहामधील तीच छोटी छुटकी असल्याचा देखील विसर पडला आहे. या व्हायरल होणाऱ्या काही फोटोंमध्ये ती बॅकलेस ड्रेसमध्ये दिसत आहे, तर काही फोटोंमध्ये ती टू पीस ड्रेसमध्ये दिसते. तिच्या या बदलेल्या लुकला पाहून फॅन्स कमेंट्स करताना दिसून येत आहे. एकाने लिहिले की, “वाटत नाही टू तीच छोटी छुटकी आहे.” तर दुसऱ्याने लिहिले, “तू खरंच खूप बदललीस.”
अमृता प्रकाशच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास तिने २००३ साली ‘कोई मेरे दिल में है’ पासून तिच्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर ती ‘विवाह’ सिनेमात दिसली. या सिनेमामुळे तिला मोठी ओळख मिळाली. त्यानंतर ती ‘एक विवाह ऐसा भी’ आणि ‘तुम बिन मिली’मध्ये महत्वाची भूमिका साकारताना दिसली. अमृताने अनेक मालिकांमध्ये देखील काम केले आहे.
हेही वाचा :










