धक्कादायक.! ४ वर्षांच्या रिलेशनशीपनंतर मलायका आणि अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप? पण झालं तरी काय? वाचा सविस्तर

बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या जोड्यांपैकी एक मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. तब्बल 4 वर्षांच्या रिलेशनशीपनंतर या दोघांच्या नात्याला तडा गेला असून, त्यांचे ब्रेकअप झाल्याची माहिती समोर येत आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार आणि माध्यमांतील चर्चेनुसार त्यांनी नाते संपवण्याचा निर्णय घेतला असून, हा धक्का सहन न झाल्याने मलायकाने स्वतःला एका खोलीत बंदिस्त केल्याचे बोलले जात आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, त्या दोघांनीही त्यांचे नाते संपले आहे आणि आता त्यांचे रस्ते वेगळे झाले आहे. वयात भलंमोठं अंतर असताना त्यांनी त्याकडे कानाडोळा करून एकमेकांच्या प्रेमाचा स्वीकार केला होता. त्यांची रोमँटिक केमिस्ट्री देखील सगळ्यांना खूप आवडत होती. अशातच त्यांच्याबाबत ही बातमी ऐकून त्यांच्या चाहत्यांना खूप दुःख झाले आहे. त्या दोघांच्या वयात तब्बल ११ वर्षाचे अंतर आहे. अर्जुन मालयकापेक्षा ११ वर्षांनी लहान आहे. (malaika arora and arjun kapoor breakup, actress isolate herself)

View this post on Instagram

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

त्यामुळे त्यांना अनेक वेळा ट्रोल केले जाते. मलायकाने १९९८ मध्ये अरबाज खान सोबत लग्न केले होते. पण काही कारणांनी त्यांचे लग्न टिकले नाही आणि त्यांनी २०१७ मध्ये घटस्फोट घेतला. मलायका आणि अरबाजला अरहान नावाचा एक मुलगा देखील आहे.

हेही वाचा :

धक्कादायक.! ४ वर्षांच्या रिलेशनशीपनंतर मलायका आणि अर्जून कपूर यांचे ब्रेकअप? पण झालं तरी काय? वाचा सविस्तर

‘फिमेल डॉन’पासून ते ‘उमराव जान’पर्यंत, या सदाबहार पात्रात रेखाजींनी जिंकलीयेत प्रेक्षकांची मने

उमर रियाझच्या हकालपट्टीवर भाऊ असीम रियाझने तोडले मौन, बोलला धक्कादायक गोष्ट

 

Latest Post