मराठी चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत. जे फक्त अभिनय न करता समाजातील इतर अनेक गोष्टींवर त्यांचे मत व्यक्त करत असतात. समाजात होत असणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर त्यांची प्रतिक्रिया देत असतात. अशातच अभिनेता सुमित राघवनने राज्य सरकारने घेतलेल्या एका निर्णयावर त्याचे मत व्यक्त केले आहे. राज्य सरकारने राज्यातील सगळ्या दुकानांच्या पाट्या मराठीत असाव्यात असा निर्णय घेतला.
यावर सुमित राघवनने (sumit raghavan) ट्विट करून त्याचे मत व्यक्त केले आहे. त्याने लिहिले आहे की, “मी म्हणतो हरकत नाही. इंग्लिशबद्दल तिरस्कार नाहीये. पण जी राज्याची भाषा आहे, ती नको का जपायला. दुकानांची नावं मराठीत लिहिणं हे सगळं वरवरचं झालं. जो ‘मराठी’ आहे त्याला किंमत आहे का भाषेची? मग अमराठी व्यापाऱ्यांच्या माथी का मारा? ही बळजबरी झाली नाही का? अवस्था बघा मराठी शाळांची?” (Actor Sumit raghavan ask a question to state government about Marathi names of shop)
मी म्हणतो हरकत नाही. इंग्लिश बद्दल तिरस्कार नाहीये. पण जी राज्याची भाषा आहे ती नको का जपायला. दुकानांची नावं मराठीत लिहिणं हे सगळं वरवरचं झालं. जो "मराठी" आहे त्याला किंमत आहे का भाषेची? मग अमराठी व्यापाऱ्यांच्या माथी का मारा? ही बळजबरी झाली नाही का? अवस्था बघा मराठी शाळांची? https://t.co/UAYE0U2cUJ
— Sumeet Raghvan सुमीत राघवन (@sumrag) January 13, 2022
त्याने केलेली ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. अनेकजण त्याच्या या पोस्टवर सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. त्याचे हे म्हणणे अनेकांना पटले आहे. अनेकांनी हे ट्विट रिट्विट देखील केले आहे. तसेच या आधी देखील त्याने अनेक सामाजिक विषयांवर त्याचे मत मांडले आहे.
सुमित राघवन हा एक उत्तम अभिनेता आणि होस्ट आहे. त्याने अनेक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आहे. त्याने अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटात काम केले आहे. त्याने ‘फास्टर फेणे’, ‘शुभमंगल सावधान’, ‘पाणीपुरी’, ‘हद करदी आपने’, ‘घर की बात है’, यांसारख्या अनेक चित्रपटात काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
हेही वाचा :