Saturday, April 20, 2024

शबरीमाला मंदिरात जाऊन अय्यप्पा स्वामीनींचे दर्शन घेण्यासाठी अजय देवगण केले ४१ दिवसांचे खडतर व्रत

बॉलिवूडचा अजय देवगण एक हिट मशीन समजले जाते. त्याचा प्रत्येक सिनेमा सुपरहिट होणारच हे सर्वश्रुत असते. नेहमीच आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत येणारा अजय ह्यावेळेस मात्र एका वेगळ्याच कारणासाठी पराशझोतात आला आहे. सध्या सोशल मेडाईवर अजयचा काळे कपडे घातलेला, डोक्यावर टिळा, गळ्यात हार घातलेला फोटो तुफान व्हायरल होत आहे. अनेकांना तर हा त्याच्या आगामी सिनेमातील लूक असल्याचे वाटत आहे. मात्र असे काहीही नसून अजयचा हा लूक त्याच्या खऱ्या आयुष्यातील एका व्रताचा आहे. अजयने अयप्पा स्वामी यांच्या दर्शनासाठी तब्ब्ल ४१ दिवसांचे खडतर व्रत ठेवले होते. यासाठी त्याने केरळमधील शबरीमाला मंदिरात जाऊन अयप्पा स्वामींचे दर्शन देखील घेतले. या दर्शनानंतर त्याने गळ्यात तुळशीमाळ देखील घातली होती.

केरळमधील शबरीमाला मंदिरात असलेल्या अयप्पा स्वामींचे दर्शन घेण्याची इच्छा अनेकांना असते. यासाठी दर्शनाआधी ४१ दिवसांचे कठीण अनुष्ठान करावे लागते याला ‘मंडलम’ म्हटले जाते. दर्शनाआधी कठीण नियमांचे पालन करावे लागते. पूजेनंतर अजय थेट त्याच्या कामावर गेला. त्याला डबिंग स्टुडिओ बाहेर देखील पाहण्यात आले. या स्टुडिओमध्ये तो पूजेचाच लूकमध्ये दिसला.

शबरीमाला मंदिरात जाण्यापूर्वी ४१ दिवस सर्व मोहमाया सोडून अगदी साधे जीवन जगावे लागते. ब्रह्मचर्याचे पालन करावे लागते. या दिवसांमध्ये निळ्या किंवा काळया रंगाचे कपडे घालावे लागतात. गळ्यात तुशीची माळ घालावी लागते. दिवसभरात एकदाच जेवण तेही अगदी साधे, जमिनीवर झोपणे आणि संध्याकाळी पूजा करावी लागते. आदी नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यानंतर शबरीमाला मंदिरात जाता येते.

अजय देवगनच्याआधी विवेक ओबेरॉय आणि अमिताभ बच्चन यांनी देखील शबरीमाला मंदिरात जाऊन अय्यप्पा स्वामींचे दर्शन घेतले आहे. त्यास्तही त्यांनी देखील ४१ दिवसांचे व्रत पळाले होते. अजयच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास लवकरच त्याचा ‘कैथी’ या साऊथचा रिमेक असलेला सिनेमा फ्लोवर जात आहे. हिंदीमध्ये ‘भोला’ नावाने हा सिनेमा तयार होत आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा