हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेत्रींच्या प्रत्येक गोष्टींची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झालेली नेहमीच आपल्याला पाहायला मिळत असते. त्यांच्या महागड्या गाड्यांबद्दल, कपड्यांबद्दल जाणून घेण्याची इच्छा चाहत्यांना असते. या अभिनेत्रींनाही कपडे, पर्स, गाड्या यांचा संग्रह करण्याचा जणू छंदच जडलेला असतो. मात्र, अभिनेत्री मलायका अरोराने मात्र तिच्या घरात भलत्याच वस्तूंचा संग्रह करून ठेवला आहे, ज्याचा खुलासा तिच्या मैत्रिणीने केला आहे.
मलायका अरोरा (Malaika Arora) ही हिंदी सिनेसृष्टीतील एक ग्लॅमरस आणि स्टायलिश अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे. तिच्या प्रत्येक लूकची माध्यमांमध्ये जोरदार चर्चा होत असते. तिचा पार्टी लूक असो किंवा सकाळचा जॉगिंग लूक आपल्या स्टायलिश लूकमुळे ती नेहमीच लक्ष वेधून घेत असते. मात्र, मलायकाच्या मैत्रिणीने एक फोटो शेअर करत तिच्याकडे असणाऱ्या एका खास कलेक्शनची माहिती दिली आहे.
हा फोटो मलायकाची खास मैत्रीण नम्रता जकारियाने शेअर केली आहे. यामागील कारणही तिने सांगितले आहे. या व्हायरल फोटोमध्ये मलायका बसलेली दिसत आहे आणि तिच्या पाठीमागे फक्त चपलांनी भरलेले एक भलेमोठे कपाट दिसत आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असंख्य बूट, सँडल्स, हाय हील्स, स्लीपर यांचा संग्रह (Malaika Arora Shoe Collection) दिसत आहे. एक आख्खे कपाट फक्त तिच्या चपलांनीच भरलेले या फोटोत पाहायला मिळत आहे.
हा फोटो शेअर करत नम्रताने “मलायकाच्या चपलांचा संग्रह इतका मोठा आहे, जितकी आपली बेडरुम असते,” असे भन्नाट कॅप्शनही दिले आहे. मलायकाचा हा खोली भरून चपलांचा संग्रह पाहून तिच्याकडे किती कपडे असतील हाच प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.
हे पाहिलं का? प्रेक्षकांवर अभिनयाची जादू करणारे ‘आशिकी’मधील कलाकार कुठे आहेत?
मलायका सिनेसृष्टीतील एक यशस्वी मॉडेल म्हणून प्रसिद्ध आहे. वयाची चाळिशी ओलांडली तरीही तिच्या चिरतरुण सौंदर्याची नेहमी चर्चा होत असते. आजही तिच्या ग्लॅमरस लूकमुळे ती चर्चेत असते. तिच्या एका फोटोसाठी टिपायला पॅपरजी नेहमीच उत्सुक असतात.
हेही वाचा :