Tuesday, July 23, 2024

‘डुग्गू घरी आला’ पुणे पोलिसांच्या कामगिरीला सिद्धार्थचा सलाम! शेअर केली भावूक पोस्ट

पुणे शहरातील बाणेर-बालेवाडी येथून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात चार वर्षांच्या स्वर्णम या लहानग्याचे दिवसाढवळ्या अपहरण केले गेले होते. त्यानंतर तब्बल आठशे पोलिसांची फौज पुणे पोलिसांनी या चिमुकल्याच्या शोधार्थ तैनात केली होती. अखेर हा ‘डुग्गू’ (टोपण नाव) बुधावारी (१९ जानेवारी) पोलिसांना सापडला आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. (siddharth jadhav reaction on pune police found kidnaped swarnav)

पुणे पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक झाले. सोशल मीडियावर तर आभार आणि धन्यवादाच्या संदेशाची लाटच आली. यात सेलिब्रेटीही पाठीमागे राहिले नाहीत. मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव याने पुणे पोलिसांचे आभार मानणारं ट्विट केले. या ट्विटमध्ये मात्र सिद्धूने लिहिलेल्या शब्दांनी सर्वांनाच भावूक केले, कारण सिद्धार्थने ट्विटमध्ये स्वतःचा उल्लेख एक बाप म्हणून केला होता.

पुण्यातील डॉ. सतीश चव्हाण यांच्या स्वर्णव (डुग्गु) या चार वर्षीय मुलाचं बालेवाडीमधून आठवडाभरापूर्वी अपहरण झालं होतं. त्यानंतर त्याचा जवळपास ३०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकरी सर्वत्र शोध घेत होते. अखेर वाकड जवळील पुनावळे येथे स्वर्णव सापडला. मात्र त्याचं कोणी अपहरण केलं? का केलं? याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पुणे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. त्याच्या त्याच्या कुटुंबासोबत फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. त्याला पाहून त्याच्या आई-वडिलांना देखील खूप आनंद झाला आहे.

मात्र चव्हाण कुटुंबाचा हा आनंद काही जास्त वेळ टिकू शकला नाही. भाचा स्वर्णव सापडलाय या आनंदात त्याला भेटायला निघालेल्या त्याच्या आत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. होय, रात्री नांदेडवरुन पुण्याच्या दिशेने निघालेल्या स्वर्णवच्या आत्याचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. सुनीता संतोष राठोड असे स्वर्णवच्या आत्याचे नाव आहे. आपल्या पती आणि दोन मुलांसह त्या प्रवास करत होत्या. दोन मुलं या अपघातात गंभीर जखमी झाली असून, त्यांच्या पतीला किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र हा अपघात इतका भीषण होता की, आत्या सुनीता यांना त्यांचा जीव गमवावा लागला.

हेही वाचा :

हे देखील वाचा