Thursday, February 6, 2025
Home साऊथ सिनेमा समंथा आणि चैतन्यच्या संसाराला पुन्हा येणार बहर, समंथाने घटस्फोटाची पोस्ट केली डिलिट

समंथा आणि चैतन्यच्या संसाराला पुन्हा येणार बहर, समंथाने घटस्फोटाची पोस्ट केली डिलिट

साउथची सध्याची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून समंथा रूथ प्रभूला ओळखले जाते. समंथा सध्या वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आहे. समंथा प्रभू आणि नागा चैतन्य हे एकमेकापासून वेगळे झाले आहेत ही बातमी समंथा प्रभूने आपल्या अधिकृत अकाउंट वरून सगळ्यांसमोर आणली होती. समंथा आणि नागा चैतन्य एकमेकापासून वेगळे झाले आहेत यावरून खूप ट्रोलिंग चालू होते परंतु या सगळ्यावर त्या दोघांनी दुर्लक्ष केले होते.

परंतु समंथा प्रभूने (samantha ruth prabhu) ते दोघे वेगळे झाल्याची पोस्ट सोशल मीडियावरून डिलीट केली  त्यामुळे ती पुन्हा ट्रोल होत आहे. समंथा प्रभू आणि नागा चैतन्य(naga chaitanya) हे आठ वर्षांपासून एकमेकाला डेट करत होते आणि त्यानंतर 2017 मध्ये त्यांनी गोव्यामध्ये लग्न केलं आणि लग्नाच्या चार वर्षांनंतरच ते दोघं वेगळे होत आहेत याची घोषणा केली. (samantha ruth prabhu deleted post announcing sepration from naga chaitanya)

समंथा आणि चैतन्यने २ ऑक्टोबर २०२१ ला वेगळे होणार याची घोषणा केली. याबद्दलची पोस्ट दोघांनीही आपल्या अधिकृत अकाउंटवरून शेअर केली होती. परंतु ती पोस्ट आता त्या अकाऊंटवरून डिलीट केली हा चर्चेचा विषय ठरला आहे. नागा चैतन्यच्या अधिकृत अकाउंटवर ती पोस्ट अजूनही तशीच आहे. परंतु समंथाने ही पोस्ट डिलीट केली आहे. दोघेजण पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा फार होते आहे.

समंथा प्रभू आणि नागा चैतन्य यांनी त्या पोस्टमध्ये असे लिहिले होते की, “आम्ही खूप विचार करून एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला आनंद आहे या गोष्टीचा की आमच्या मैत्रीला एक दशक पूर्ण होतील. आमच्यात काहीही घडलं असलं तरी आमची मैत्री तशीच राहील. ”

समंता प्रभू नागा चैतन्यपासून वेगळं होण्याच्या कारणावरून ट्रोल देखील केल जात होती. तेव्हा दोघांनीही आपल्या चाहत्यांना- मीडियाला सांगितले की, “आम्ही दोघे एकमेकांपासून वेगळे होते आहोत. या काळात तुमचा आशीर्वाद आणि तुमचा पाठिंबा फार महत्त्वाचा आहे. आम्हाला स्वतःचा वेळ हवा आहे आणि कृपया तो द्यावा.” या दोघांनीही अनेक प्रतिक्रियांवरती दुर्लक्ष केले.

दोघे एकमेकांपासून वेगळे झाले त्यावेळी समंथा प्रभू चारधाम यात्रेला गेली. तिच्या अध्यात्मिक प्रवासाचा आनंद घेत होती असं तिचं म्हणणं आहे. जवळजवळ आठ वर्ष समंथा प्रभू आणि नागा चैतन्य एकत्र डेट करत होते. आणि लग्नाच्या चार वर्षांनंतरच एकमेकांपासून लांब झाले.

हेही वाचा :

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा