Thursday, July 18, 2024

आई शप्पथ खरंच? आपल्या रोहित भाऊ शर्माचं आणि ‘या’ हिरोईनचं होतं म्हणे? पुढे काय झालं, वाचा

क्रिकेटच्या जगात आपल्या फलंदाजीने भल्या भल्या गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या मुंबईकर रोहित शर्माबाबत एक गुपीत सध्या सर्वांच्या समोर आलंय. हे गुपित म्हणजे रोहित शर्मा आणि त्याच्या तत्कालिन कथित गर्लफ्रेंड यांच्यात झालेल्या छुप्या प्रेम प्रकरणाचं.

क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि प्रसिद्ध मॉडेल सोफिया हयात यांच्या अफेअर चर्चा एकेकाळी मोठ्या प्रमाणात रंगल्या होत्या. सोफिया सध्या एक पुस्तक लिहीतेय. कदाचित यात ती यावर भाष्य करेल. मात्र, त्यापुर्वी बोंबाबोंबच्या प्रेक्षकांनी ते प्रकरण काय होते ते एकदा वाचायलाच हवे.

टीव्ही क्षेत्रातील सर्वात जास्त विवादित कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस’ हा शो ओळखला जातो. याच शोच्या एक पर्वात ‘सोफिया हयात’ ही मॉडेल सहभागी झाली होती. बिग बॉसच्या त्या पर्वातील ती विवादित स्पर्धक म्हणून प्रसिद्ध देखील झाली.

सोफिया नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टींसाठी चर्चेत असते. कधी ती तिच्या न्यूड फोटोंमुळे, तर कधी तिच्या पतीने तिच्यावर केलेल्या हमल्याच्या बातम्यांमुळे ती प्रकाशझोतात असते. आता तर सोफियाने एक ती एक पुस्तक लिहीत असल्याचे जाहीर केले असून, त्यात तिने तिच्या आणि क्रिकेटर रोहित शर्माच्या नात्याबद्द्दल एक खुलासा केला आहे. तिच्या या खुलाशामुळे सोफिया अचानक लाइमलाइट मध्ये आली.

लंडनस्थित मॉडेल सोफिया हयात हिने बिगबॉसच्या सातव्या पर्वात सहभागी होत मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर तिने अनेक लहान मोठ्या कार्यक्रमात हजेरी लावली. तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून न्यूड फोटो शेयर केल्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली.

त्यानंतर तिने तिच्या नवऱ्यावर तिला जिवेमारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देखील लावला होता. अचानक ती गायब झाली आणि पुन्हा एकदा चर्चेत आली.

हेही वाचा – गुड न्यूज! अभिनेत्री प्रियंका चोप्रा बनली आई! पण कुणालाच खबर नाही? अखेर प्रियंकानेच केला खुलासा, वाचा

सोफियाने स्टार क्रिकेटर रोहित शर्मा आणि आपण २०१२ साली नात्यात (रिलेशनशिप) असल्याचे सांगितले होते. तसेच आपण डेटवर गेल्याचेही तिने सांगितले होते. याबद्दल सांगताना ती म्हणाली, “तिची आणि रोहितची पहिली भेट लंडनच्या एका हॉटेलमध्ये झाली. माझ्या मित्राने मला रोहितची ओळख करून दिली. तेव्हा मी क्रिकेट बघत नव्हती त्यामुळे मी रोहितला ओळखले नाही. त्यादिवशी आम्ही भेटल्यानंतर खूप गप्पा मारल्या. गप्पांच्या ओघात त्याने मला किस केले. त्यानंतर चार दिवसांनी तो माझ्या घरी आला आणि माझ्यासोबत राहिला.” असा खळबळजनक दावा तिने केला होता.

पुढे ती म्हणाली, “काही दिवसांनी रोहितने मीडियासमोर मला त्याची फक्त एक फॅन असल्याचे सांगितले. त्याच्या या बोलण्यामुळे मी खूप दुखी झाली आणि हे नाते तिथेच थांबवले.” यासंदर्भात अजूनपर्यंत रोहितकडून कोणताच खुलासा झाला नाही. सोफियाने काही वर्षांपूर्वी मॉडेलिंग सोडून संन्यास स्वीकारत साध्वी झाल्याचे जाहीर केले.

रोहित शर्माचे सध्या लग्नही झाले असून त्याला एक मुलगी असल्याचे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तसेच रोहितनेही एकदा सोफिया आपली फॅन असल्याचे सांगितल्यानंतर त्यावर कधीच कोणतेही भाष्य केलेले नाही. मात्र, आता स्वतः सोफिया पुस्तकातून नेमका काय खुलासा करते ते मात्र पाहायला हवे.

अधिक वाचा –

हे देखील वाचा