Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड श्वास रोखून धरा! ‘केजीएफ २’ ते ‘ब्रह्मास्त्र’, २०२२ मध्ये रिलीझ होणार आहेत ‘हे’ ७ मोठे सिनेमे

श्वास रोखून धरा! ‘केजीएफ २’ ते ‘ब्रह्मास्त्र’, २०२२ मध्ये रिलीझ होणार आहेत ‘हे’ ७ मोठे सिनेमे

चित्रपटसृष्टीला सर्वात मोठा फटका बसला, तो म्हणजे कोरोना व्हायरसचा. अनेक सिनेमे मागील १-२ वर्षांपासून प्रदर्शित होण्यासाठी सज्ज असूनही प्रदर्शित होऊ शकले नाहीत. यादरम्यान काही सिनेमांच्या निर्मात्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपले सिनेमे प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, काही सिनेमे असे आहेत, ज्यांना फक्त आणि फक्त चित्रपटगृहातच प्रदर्शित करण्यासाठी निर्माते अजूनही वाट पाहतायत. आपण आजच्या या लेखातून २०२२ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या काही सिनेमांबद्दल जाणून घेणार आहोत.

आरआरआर
दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांचा बहुप्रतिक्षित ‘आरआरआर‘ (RRR) या सिनेमाची प्रेक्षक खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण या सिनेमात राम चरण (Ram Charan), ज्युनिअर एनटीआर (JR NTR), अजय देवगण (Ajay Devgan) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांसारखी दिग्गज कलाकारांची फळी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा ७ जानेवारीला प्रदर्शित होणार होता. मात्र, कोरोनाचे कडक निर्बंध सुरू असल्याने सर्व चित्रपटगृह बंद आहेत आणि म्हणून हा सिनेमा प्रदर्शित होऊ शकला नाही. अजून सुद्धा ‘आरआरआर’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी सिनेमा प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर केली नाही.

केजीएफ २
‘केजीएफ’च्या पहिल्या भागानंतर प्रेक्षकांना उत्सुकता आहे, ती म्हणजे ‘केजीएफ २‘ (KGF 2) या दुसऱ्या भागाची. दिग्दर्शक प्रशांत नील यांच्यासोबत पुन्हा एकदा सुपरस्टार यशची (Yash) जादू प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचणार आहे, यात तीळमात्र शंका नाही. विशेष म्हणजे, या सिनेमात संजय दत्त (Sanjay Dutt) आणि रवीना टंडन (Raveena Tandon) हे दोघेही पाहायला मिळणार आहेत. ‘केजीएफ २’च्या टिझरला युट्यूबवर आतापर्यंत २३ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. चित्रपटगृह सुरू झाले, तर १४ एप्रिल, २०२२ला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होईल.

ब्रह्मास्त्र
अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) या सिनेमासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. अयान मुखर्जीच्या या सिनेमात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), नागार्जुन (Nagarjuna) आणि मौनी रॉय (Mouni Roy) हे मुख्य भूमिकेत आहेत. तीन सिनेमांची ही सीरिज मायथॉलोजी आणि सायन्स-फिक्शनने भरली आहे. सध्यातरी हा सिनेमा या वर्षी ९ सप्टेंबरला प्रदर्शित होईल, असे म्हटले जात आहे.

लाल सिंग चड्ढा
‘लाल सिंग चड्ढा’ (Lal Singh Chaddha) या सिनेमात आमिर खान (Aamir Khan) आणि करीना कपूर (Kareena Kapoor) हे मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाचं चित्रीकरण अद्वैत चंदन यांनी केलं आहे. हा सिनेमा १४ एप्रिल, २०२२ रोजी प्रदर्शित होण्यासाठी तयारीत आहे.

भेडिया
अमर कौशिक दिग्दर्शित ‘भेडिया’ (Bhediya) या सिनेमात वरुण धवन (Varun Dhawan), क्रिती सेनन (Kriti Sanon) आणि दीपक डोबेरियाल (Deepak Dobriyal) हे मुख्य भूमिकेत आहेत. इतकंच नाही, तर या सिनेमाच्या टिझरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. हा सिनेमा २५ नोव्हेंबर, २०२२ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

पृथ्वीराज
पुढील सिनेमा म्हणजे ‘पृथ्वीराज’ (Prithviraj) होय. या सिनेमात अक्षय कुमार (Akshay Kumar), मानुषी छिल्लर (Manushi Chhillar), सोनू सूद (Sonu Sood), संजय दत्त (Sanjay Dutt) यांनी मुख्य पात्र साकारलं आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केलं आहे. सिनेमात अक्षय कुमार हा पृथ्वीराज चव्हाण ही भूमिका साकारणार आहे. मानुषी छिल्लर ही या सिनेमातून बॉलीवूड पदार्पण करणार आहे. २१ जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार होता. मात्र, कोरोना निर्बंधांमुळे हा सिनेमा प्रदर्शित होऊ शकला नाही. आता हा सिनेमा १ एप्रिल, २०२२ रोजी प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.

हेही पाहा- सुपरस्टार्ससोबत काम करणारी आंचल सिंग एका वेबसीरिजमुळे आली चर्चेत

धाकड
‘धाकड’ या सिनेमात कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि अर्जुन रामपाल (Arjun Rampal) एकत्र झळकणार आहेत. रजनीश घई यांच्या या सिनेमासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

हा सिनेमा मोठ्या बजेटमध्ये बनवला आहे. हा एक ऍक्शन सिनेमा आहे. कंगनाचा हा सिनेमा याच वर्षी ८ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा-

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा