×

कुणी पदवीधर, तर कुणी अर्ध्यातूनच सोडलं शिक्षण; पाहा तुमच्या आवडत्या टॉलिवूड कलाकारांचे किती झालंय शिक्षण

चित्रपटक्षेत्रात सध्या सर्वत्र दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा प्रभाव वाढताना दिसत आहे. आपल्या दमदार अभिनयाने आणि स्टाईलमुळे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक कलाकार प्रचंड लोकप्रिय ठरत आहेत. फक्त दक्षिणेतच नाही, तर संपूर्ण भारतात या कलाकारांचे चाहते पाहायला मिळत आहेत. या कलाकारांच्या चित्रपटांइतकीच त्यांच्या दैनंदिन आयुष्याबद्दलही जाणून घेण्याची त्यांच्या चाहत्यांची इच्छा असते. आज अशाच लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्यांच्या शिक्षणाबद्दल माहिती घेणार आहोत. चला तर पाहूया तुमचे आवडते दाक्षिणात्य कलाकार शिकलेत तरी किती?

अल्लू अर्जुन (Allu Arjun)
सध्या सर्वत्र अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा‘ चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे. म्हणून सर्वात प्रथम जाणून घेऊया अल्लू अर्जुनच्या शिक्षणाबद्दल. अल्लूने आपले शिक्षण चेन्नईच्या सेंट पॅट्रिक विद्यालयातून घेतले आहे. त्यानंतर त्याने हैद्राबादच्या एमएसआर कॉलेजमधून बीबीएची पदवी मिळवली आहे.

View this post on Instagram

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

रजनीकांत (Rajinikanth)
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी आपले शालेय शिक्षण बंगळुरूच्या गविपूरम गव्हर्नमेंट कन्नड मॉडेल हायस्कूलमधून घेतले आहे. त्यानंतर त्यांच्या भावाने त्यांना रामकृष्ण मठात वेद आणि इतिहासाच्या अभ्यासासाठी पाठवले होते. इथे त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. पुढे त्यांनी मद्रास फिल्म इंस्टिट्यूटमधून अभिनयाचे शिक्षण घेतले.

View this post on Instagram

A post shared by Rajinikanth (@rajinikanth)

महेश बाबू (Mahesh Babu)
सुपरस्टार महेश बाबूने चेन्नईच्या लोयोलो कॉलेजमधून बी. कॉमची पदवी मिळवली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही महिन्यातच त्याने अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. महेश बाबू हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहे.

View this post on Instagram

A post shared by Mahesh Babu (@urstrulymahesh)

प्रभास (Prabhas)
‘बाहुबली’ चित्रपटातून प्रसिद्धिच्या शिखरावर पोहोचलेल्या सुपरस्टार प्रभासने हैद्राबादच्या चैतन्य कॉलेजमधून बी. टेकची पदवी मिळवली आहे. हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने अभिनयात करिअर करण्यास सुरुवात केली.

View this post on Instagram

A post shared by Prabhas (@actorprabhas)

विजय (Vijay)
सुपरस्टार ‘थालापती’ विजयने चेन्नईच्या लोयोलो कॉलेजमध्ये व्हिज्युअल कम्युनिकेशनच्या डिग्रीसाठी प्रवेश घेतला होता. मात्र, अभिनयाच्या आवडीमुळे त्यांनी आपले शिक्षण अर्धवट सोडून दिले. सध्या विजय दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो.

हेही पाहा- कोणी पैश्यांसाठी तर कोणी प्रेमासाठी घेतला प्रसिद्ध अभिनेत्रींचा जीव

धनुष (Dhanush)
‘कोलावरी डी’ गाण्यामुळे प्रसिद्ध झालेल्या सुपरस्टार धनुषने १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर त्याने चित्रपटक्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली.

View this post on Instagram

A post shared by Dhanush (@dhanushkraja)

अभिनयक्षेत्रात काम करता करता धनुषने बीसीएची पदवी मिळवली आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील यशस्वी अभिनेता अशी धनुषची ओळख आहे.

हेही वाचा-

Latest Post