Saturday, January 17, 2026
Home बॉलीवूड मनामनात देशभक्तीची ज्योत पेटवणारी ही गाणी ऐकताच तुम्हीही बोलाल, ‘भारत माता की…जय!’

मनामनात देशभक्तीची ज्योत पेटवणारी ही गाणी ऐकताच तुम्हीही बोलाल, ‘भारत माता की…जय!’

भारतीय चित्रपटांमध्ये देशभक्ती या भावनेशी जुडलेले अनेक चित्रपट आहेत. ज्यांची गाणी आपल्याला देशभक्तीमध्ये मिसळून घेतात.यावर्षी भारत 76 वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. चला तर या स्वातंत्र्यदिनी ऐकुयात अशी काही अमर गाणी जी ऐकून प्रत्येक भारतीयाचे मन देशभक्तीमध्ये डुंबून जाईल.

अक्षय कुमार याचा चित्रपट ‘तेरी मिट्टी का’ हे गाणं ऐकल्यावर प्रत्येकाचे डोळे भरून येतात. या गाण्याला बी प्राक यांनी गायिले आहे. संगीत आर को तर लिरिक्स मनोज मुंतशीर यांनी लिहले आहे. या चित्रपटात असे दाखवले आहे की, एक जवान त्याच्या कुटुंबापासून लांब राहून आपल्या देशाची सुरक्षा करण्यासाठी लढाई करतो. आणि देशासाठी शहीद सुद्धा होतो.

‘ऐ वतन’ ( राजी ) आलिया भट्ट चित्रपट राजीचे ए वतन हे गाणे सुनिधी चौहान हीने गायले आहे. ज्याचे लीरिक्स गुलजार आणि अल्लामा ईकबाल यांनी लिहीले आहे. आणि शंकर एहसान लॉय यांनी संगीत दिले आहे. या चित्रपटात आणि गाण्यात एक मुलगी,बायको,सून आणि नंतर देशाची रक्षक असा प्रवास दाखवला आहे.

‘कंधे से मिलते है कंधे’ ( लक्ष ) या गाण्यात जवान एकमेकांना कसे सहारा देतात आणि देशासाठी कसे सोबत लढतात हे दाखवले आहे. तसेच ते कसे एकमेकांसोबत हसतात रडतात हे देखील दाखवले आहे.

जावेद अख्तर यांनी लिहलेल्या लिरिक्समध्ये सैनिकांमधील मैत्री चांगल्या रितीने दाखवली आहे. हे गाणे शंकर महादेवन, सोनू निगम, कुणाल गांजवाला, हरिहरन, रूप कुमार राठोड या सर्वांनी मिळून गायले आहे.

‘छल्ला’ (उरी) या गाण्याला पंजाबी भांगडा पॉप आणि हरक कोर रॉक यांच्यासोबत आकर्षित बनवले आहे. यामध्ये एका जवानाची कहाणी दाखवली आहे की, तो कसा शेवटच्या श्वासापर्यंत लढतो. आणि देशासाठी तो मरण पत्करायला सुद्धा तयार होतो. त्याचा उद्देश दुष्मनाणा संपवणे एवढाच आहे. हे गाणे रोमी, विवेक, हरिहरन आणि शाश्र्वत यांनी गायले आहे. आणि लीरिक्स कुमार यांनी लिहीले आहे.

मां तुझे सलाम (मां तुझे सलाम)

सनी देओल याचा चित्रपट मां तुझे सलाम का हे गाणे आज पण देशवासींच्या मनात उत्साह भरत असतो.

रंग दे बसंती (रंग दे बसंती)

चित्रपट ‘रंग दे बसंती (2006)’ याचे टायटल साँग ‘रंग दे बसंती’ ऐकल्यावर प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभावनेची ज्योत अपोआप पेटते.

चक दे इंडिया (चक दे इंडिया)

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याच्या ‘चक दे इंडिया’ या चित्रपटाचे टायटस साँग चक दे इंडिया हे गाणे ऐकताच आजही कित्येक भारतीयांचे उर अभिमानाने भरून येते.

है प्रीत जहां की रीत सद (पूरब और पश्चिम)

सर्वकालीन हीट अभिनेते मनोज कुमार यांचा प्रसिद्ध चित्रपट पूरब और पश्चिम यातील गाणे है प्रीत जहां की रीत सदा आजही प्रत्येक देशवासीयांच्या मनात घर करून आहे.

दिल दिया है जान भी देंगे (कर्मा)

दिलीप कुमार यांचा चित्रपट कर्मा यातील गाणे दिल दिया है जान भी देंगे.. हे गाणे आजही राष्ट्रीय सणांच्या दिवशी नेहमीच प्रत्येक ठिकाणी लागले जाते.

ऐसा देश है मेरा ( वीर जारा)

चित्रपट वीर जारा मधील हे गाणे ऐसा देश है मेरा प्रत्येक देशभक्तीपर प्रसंगांसाठी खास आहे. ही अशी गाणी आहेत, जी ऐकल्यावर नक्कीच आपल्या मनातील देशभक्ती जागी होते.

हेही वाचा –
‘या’ बॉलिवूड कलाकारांच्या रक्तातच देशभक्ती! भारतीय सैन्याशी आहे घट्ट नातं
‘या’ चित्रपटांमधील संवाद ऐकताच तुमच्या मनात जागृत होईल देशभक्तीची भावना; पाहा यादी

हे देखील वाचा