×

प्रजासत्ताक दिन: ‘या’ चित्रपटांमधील संवाद ऐकताच तुमच्या मनात जागृत होईल देशभक्तीची भावना; पाहा यादी

बुधवारी (२६ जानेवारी २०२२) रोजी आपण ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. २६ जानेवारी १९४९ रोजी आपण आपलेभारतीय संविधान स्विकारले म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९५० सालापासून २६ जानेवारीच्या हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून घोषित केला.

आपल्या संपूर्ण देशासाठी आणि देशवासियांसाठी हा दिवस खूप महत्वाचा असतो. राष्ट्रीय सण आपण या दिवशी साजरा करत असतो. या दिवशी आपल्या आजूबाजूचे संपूर्ण वातावरण देशभक्तीच्या रंगात रंगून गेलेले असते.

देशभक्तीने आणि देशप्रेमाने ओतप्रोत होत असलेल्या आपल्या भावना चित्रपटांमुळे अधिकच प्रबळ होतात. आपले अनेक चित्रपटांमधून देखील नेहमी देशप्रेम आणि देशभक्ती दिसत असते. या देशप्रेमावर आधारित चित्रपटांना अधिक मजबूत करतात ते या सिनेमांमधील संवाद. हे संवाद एकूणच ऐकणाऱ्याच्या नसानसात देशाबद्दल अभिमान जागृत होतो. आज आपण या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने चित्रपटांमधील असेच काही देशभक्ती जागवणारे संवाद बघणार आहोत.

गदर एक प्रेमकथा :

Sunny Deol, Amisha Patel to reunite for Gadar Ek Prem Katha sequel |  Bollywood - Hindustan Times

सनी देओल आणि अमिषा पटेल यांची प्रमुख भूमिका असणारा हा सिनेमा २००१ साली प्रदर्शित झाला. भारत, पाकिस्तान अशा दोन विरुद्ध असणाऱ्या देशांमधल्या प्रेमी जोडयांची कथा या सिनेमात दाखवली आहे. यात सनी देओलचा असणारा “हमारा हिंदूस्तान जिंदाबादा था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा,” आजही लोकांची तोंडी ऐकायला मिळतो.

चक दे इंडिया :

Did you know that Shah Rukh Khan was not the first choice for 'Chak De!  India'? | Hindi Movie News - Times of India

२००७ साली आलेला शाहरुख खानचा हा सिनेमा जबरदस्त हिट झाला होता. एक कोच त्याच्या हॉकी खेळाडूंना वर्ल्डकप मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतो. या सिनेमात खेळाडूंच्या मनात देशाबद्दल खेळण्याची भावना जगवण्यासाठी शाहरुख म्हणतो, “मुझे स्टेट्स के नाम ना सुनाई देते हैं..ना दिखाई देते हैं..सिर्फ एक मुल्क का नाम है सुनाई देता है इंडिया..”

 रंग दे बसंती :

Rang De Basanti (Original Motion Picture Soundtrack) - Album by A.R. Rahman  | Spotify

राकेश ओमप्रकश मेहरा यांचा २००६ साली आलेला हा सिनेमा प्रचंड गाजला. देशातील संरक्षण दलातील भ्रष्टाचारावर आधारित या सिनेमात अमीर खानच्या तोंडी असणारा संवाद ऐकणाऱ्याच्या मनात देशप्रेम जागवल्याशिवाय राहत नाही. “अब भी जिसका खून ना खौला, खून नहीं वो पानी है…जो देश के काम ना आए वो बेकार जवानी है.”

बॉर्डर :

When Border director JP Dutta said he's 'frustrated' and 'hurt' by the  film's success | Bollywood - Hindustan Times

१९९७ साली आलेला हा चित्रपट सुपरहिट झाला होता. भारत पाकिस्तान यांच्या युद्धावर आधारित असलेला हा सिनेमा देशप्रेमाचे उत्तम उदाहरण आहे. यात सुनील शेट्टीच्या तोंडी असणारा संवाद सर्वांच्याच मनात देशभक्ती जागवतो. “शायद तुम नहीं जानते..ये धरती शेर भी पैदा करती है, ऐसे शेर जो दूसरों को मिट्टी में मिलाते हैं”

रंग दे बसंती :

सन २००६ साली आलेल्या या सिनेमात आर. माधवच्या तोंडी असणारा हा संवाद वास्तविक आणि खरा वाटतो.“कोई देश परफेक्ट नहीं होता..उसे बेहतर बनाना पड़ता है”

लक्ष्य :

ऋतिक रोशनचा  हा सिनेमा तरुणांसाठी खूपच प्रेरणा देणारा आहे. यात ऋतिक रोशनचा संवाद प्रेरणा देणारा आणि अगदी खरा आहे.“यह इंडियन आर्मी है, हम दुश्मनी में भी एक शराफत रखते हैं”

बेबी :

सन २०१५ साली आलेला अक्षय कुमारचा हा सिनेमा खूपच गाजला यातले संवाद देखील खूप प्रसिद्ध झाले. “रिलीजियन वाला जो कॉलम होता है उसमें हम बोल्ड एंड कैपिटल में इंडियन लिखते हैं

हॉलिडे :

अक्षय कुमारचा २०१४ साली आलेला हा सिनेमा आजही मनापासून पहिला जातो. आर्मी ऑफसरची भूमिका साकारणाऱ्या अक्षयचा ह्या सिनेमातला एक संवाद प्रचंड देशप्रेमाने भरलेला आहे. “जब वहां बॉर्डर पर लोग अपनी नींद की परवाह ना करते हुए जागते हैं, तब तुम्हें यहां शहर में चैन की नींद आती है।

मंगल पांडे :

आमिर खानचा २००५ साल आलेला हा सिनेमा मंगल पांडे यांच्यावर आधारित होता. या सिनेमातला आमिरचा संवाद देखील देशप्रेम जागवणारा होता. “ये आजादी की लड़ाई है, गुजरे हुए कल से आजादी, आने वाले कल के लिए”

माँ तुझे सलाम :

सनी देओलचा हा सिनेमा सुद्धा देशभक्तीवर आधारित होता. “दूध मांगोगे तो खीर देंगे, कश्मीर मांगोगे चीर देंगे”

क्रांतिवीर :

नाना पाटेकरांच्या सर्वात उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक असणारा हा चित्रपट देखील देशावर आधारित होता. “मुसलमान का खून ये हिंदू का खून…बता इसमें मुसलमान का कौन-सा हिंदू का कौन-सा…”

उरी द सर्जिकल स्ट्राइक:

पाकिस्तानच्या उरी हल्यावर आधारित हा सिनेमा खूपच गाजला. यातला “हाउज द जोश…हाई सर,” हा संवाद आजही लोकांमध्ये होश भरतो.

हेही वाचा :

Latest Post