Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

असे काय झाले होते की अंगद बेदी आणि नेहा धुपीयाला करावे लागले होते पळून जाऊन लग्न?

अभिनेता ‘अंगद बेदी’ आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. अंगद बेदी हा क्रिकेटर बिशन सिंह बेदी यांचा मुलगा आहे. 2014 मध्ये अंगदने ‘काया तरण’ या चित्रपटातून टेलिव्हिजनमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 7 वर्षांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. त्यानी बॉलिवूडमधील ‘फालतू’ या सिनेमातून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पाहिले पाऊल टाकले. 2018 मध्ये जेव्हा अंगद बेदीने अभिनेत्री ‘नेहा धुपिया’ हीच्या सोबत लपून लग्न केले त्यानंतर तो खूपच चर्चेत राहिला. त्याच्या सगळ्या चाहत्यांमध्ये फक्त अंगद आणी त्यांनी लपून केलेल्या लग्नचाच विषय चालायचा.

अंगदने नेहाला पहिल्या वेळेस जिममध्ये पाहिले होते. त्यावेळेस अंगद हा दिल्लीकडून उंडर 19 क्रिकेट मध्ये खेळत होता आणि नेहा मिस इंडिया पेजेंटची तयारी करत होती. नेहाला पहिल्या वेळेस जिममध्ये पाहूनच अंगदची विकेट पडली होती. म्हणजे सुरवातीला हे फक्त वन साईड लव्ह होतं.

अंगदने सांगितले की, जेव्हा तो दिल्लीमध्ये अंडर 19 क्रिकेट खेळत होता तेव्हा त्याने नेहाला पहिल्यांदा एका जिममध्ये पाहिले. जिममध्ये नेहाची रनिंग टेकनीक बघून मी खूपच इंप्रेस झालो आणि तेव्हा मला नेहाचं नाव माहीत झालं.

त्यानंतर अंगद असं सांगतो की, बऱ्याच वर्षांनंतर आमची भेट मुंबई मध्ये झाली आणि तेव्हा आम्ही दोघे चांगले मित्र बनलो. मी त्यावेळेस आमच्या नात्याला पुढे घेऊन जायला तयार होतो. पण तेव्हा नेहाला माझ्याकडून फक्त मैत्री पाहिजे होती. त्यानंतर हळू हळू आमची मैत्री घट्ट झाली आणि नंतर जाऊन आमच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाले. नेहा आणि अंगदने 10 मे 2018 मध्ये कोणालाही न सांगता दिल्लीतील गुरुद्वारामध्ये लपून लग्न केलं. आणि नंतर काही दिवसांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करून सगळ्या चाहत्यांना ही बातमी दिली.

अंगद आणि नेहाच्या लग्नाची बातमी वाचून त्यांचे फॅन्स खूपच आश्चर्यचकित झाले. अचानक लग्नाचे फोटो बघून काही फॅन्सनी असा देखील अंदाज लावला की नेहा प्रेग्नेंट आहे. आधी तर अंगद आणि नेहाने या गोष्टीला नकार दिला होता. परंतु नंतर जाऊन त्यांनी त्यांच्या तोंडाने सगळे सत्य प्रेक्षकांसमोर सांगितले. नेहा धूपिया हीचा ‘नो फिल्टर नेहा’ या शोमध्ये अंगदने स्वतः प्रेक्षकांसमोर सांगितले होते की, नेहा ही लग्नाच्या आधीच प्रेग्नेंट होती.

अधिक वाचा-
‘चुपके चुपके’च्या सेटवर जेव्हा हृषिकेश मुखर्जीने अमिताभ आणि धर्मेंद्र काढला होता राग, वाचा मजेशीर किस्सा
काळजाला चटका लावणारी बातमी! ज्येष्ठ मराठी दिग्दर्शकाचे निधन; जगभरातील चाहते शोकसागरात

हे देखील वाचा