Thursday, September 28, 2023

काळजाला चटका लावणारी बातमी! ज्येष्ठ मराठी दिग्दर्शकाचे निधन; जगभरातील चाहते शोकसागरात

मराठी सिनेसृष्टीतून काळीज तोडणारी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध कवी आणि दिग्दर्शक सुभाष अनंत भुरके यांचे दु:खत निधन झाले आहे. त्यांच्या निधनमुळे संपूर्ण सिने सृष्टीला मोठा धक्का बसला आहे. भुरके यांनी शनिवारी पुणे येथील कर्वेनगर मधील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने भुरके कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोळला आहे.

भुरके हे 86 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. 9156 साली ‘नवरा म्हणू नये आपला’ या दिनकर पाटील दिग्दर्शित चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. आणि त्याच वेळी पहिल्यादा सुभाष भुरके (subhash bhurke) यांनी चित्रपट व्यवसायात पदार्पण झाले. राजा ठाकूर आणि भालजी पेंढारकर यांच्याकडे सहाय्यक म्हणून त्यांनी काम केले आहे.

भुरके हे मुळचे कोल्हापूरतील संभाजीनगर येथिल राहणारे होते. ते अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या स्थापनेपासूनचे ते संस्थापक सदस्य पदावर होते. महामंडळाचे उपाध्यक्ष व प्रमुख कार्यवाह म्हणून त्यांनी अनेक वर्षे काळजीपूर्वीक काम केले. त्याचवेळी त्यांनी जिल्हा सिने पत्रकार संघाचे कार्यवाह म्हणूनही म्हणून देखील काम केले.

‘सोयरिक’ हा त्यांचा पहिला चित्रपट आहे. जो 1976 साली आला. या चित्रपटापासून त्यांनी स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम सुरू केले होता. कथा, पटकथा, संवाद, लघुपट लेखनाबरोबरच सिने पत्रकार म्हणूनही भुरके यांनी काम केले आहे. ‘महालक्ष्मी दिनदर्शिका जिथे जिथे, साक्षात लक्ष्मी वसे तिथे’ या श्री महालक्ष्मी दिनदर्शिकेच्या पहिल्या रेडिओ जाहिरातीचे त्याने लेखन केले होते.(Famous poet, journalist and director Subhash Anant Bhurke passed away)

अधिक वाचा-
लग्नाच्या अगोदर परिणीती आणि राघव चड्डा बाबा महाकालच्या दर्शनाला, मंदिरातील ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
यशस्वी सूत्रसंचालिका ते फरहान अख्तरची गर्लफ्रेंड असणाऱ्या शिबानी दांडेकरबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहे का?

हे देखील वाचा