Monday, August 4, 2025
Home बॉलीवूड अभिनेता ते नेता जणू ट्रेंडच!! बंगाली अभिनेता दिपांकर डे यांचा ‘तृणमूल काँग्रेस’ मध्ये प्रवेश, ७५ व्या वर्षी केले होते लग्न

अभिनेता ते नेता जणू ट्रेंडच!! बंगाली अभिनेता दिपांकर डे यांचा ‘तृणमूल काँग्रेस’ मध्ये प्रवेश, ७५ व्या वर्षी केले होते लग्न

बंगालीमध्ये देखील अनेक सुपरस्टार्स आहेत. ज्यांची ख्याती आज संपूर्ण भारतात पसरली आहे. त्यातीलच एक सुपरस्टार म्हणजे दिग्गज बंगाली अभिनेता ‘दीपांकर डे’. दीपांकर हे एक उत्कृष्ट अभिनेते आहेत. त्यांच्या अभिनयाने त्यांनी लाखो प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. पण आता हाती आलेल्या माहितीनुसार  दीपांकर डे यांनी ‘तृणमूल काँग्रेस’ या राजकीय पक्षात प्रवेश केला आहे. त्यांनी शुक्रवारी (5 फेब्रुवारी) पक्षातले अनेक दिग्गज नेते आणि अभिनेता ‘ब्रत्या बासू’ यांच्या उपस्थितीत ‘तृणमूल काँगेस ‘ या पक्षात प्रवेश केला.

दिपांकर हे टॉलिवूडमधील एक नावाजलेले कलाकार होते. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात ‘सत्यजित रे’ यांच्या ‘सीमाबद्ध’ या चित्रपटापासून केली.  दीपांकर हे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आणि टीएससीच्या संस्थापिका ‘ममता बॅनर्जी’ यांचे कट्टर समर्थक आहेत.

दीपांकर हे ‘सत्यजित रे’ यांच्या चित्रपटाद्वारे घडलेला एक नामांकित सितारा आहे. ज्यांच्यामध्ये जण अरन्या, गणसूत्रा, शखा प्रोशखा, आगुंतक सामील आहेत. दिपांकर यांनी अनेक आर्ट आणि कमर्शियल चित्रपटांमध्ये काम केले आहे. बंगाली इंडस्ट्रीमध्ये ते एक नावजलेल व्यक्तिमत्व‌ आहे. ह्यांनी आता राजकारणात प्रवेश केला आहे.

तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर दिपांकर‌‌ असे म्हणतात की, “मी खूप वर्षांपासून तृणमूल काँग्रेसचा समर्थक आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांनी मला ‘बंगा विभूषण’ या पारितोषिकाने सन्मानित केले आहे. त्यामुळे मी तृणमूलसोबत विश्वासघात नाही करू शकत.”

‘बंगा भूषण’ आणि ‘बंगा विभूषण’ हे बंगाल सरकारद्वारे बनवलेले पुरस्कार आहेत.‌ समाजातील विविध व्यक्ती आणि सेवा यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. दीपांकर यांच्या व्यतिरिक्त टीव्ही कलाकार ‘भरत कौल’ आणि ‘लवली मित्रा’ यांनी देखील तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तसेच क्लासिकल संगीतकार ‘उस्ताद रशीद खान’ यांची मुलगी ‘शोएना खान’ ही स्वत: संगीतकार आहे.‌ ती सुद्धा तृणमूल पक्षात सामील झाली आहे.

दीपांकर डे यांनी त्यांचा वयाच्या 75 व्या वर्षी अभिनेत्री ‘डोलन रॉय’ हिच्यासोबत विवाह केला आहे. त्यानंतर  दीपांकर खूपच चर्चेत आले होते. डोलन देखील बंगाली इंडस्ट्रीमधील एक नावाजलेली अभिनेत्री आहे. दिपांकर आणि डोलन यांनी मागच्याच वर्षी 16 जानेवारीला लग्न केले आहे.  दीपांकर आणि डोलन यांच्या नात्यातील खास गोष्ट म्हणजे त्यांनी त्यांचं नातं कधी कोणापासून लपवून ठेवले नाही.‌ ते बरेच वर्ष रिलेशनमध्ये होते. पण आताच मागच्या वर्षी त्यांनी लग्न केले आहे. त्यांच्या लग्नात त्यांच्या जवळचे काही नातेवाईक आणि जवळचे मित्र आले होते.

हेही वाचा-

अभिनेत्री कंगना रणौत लवकरच होणार पंतप्रधान, अशाप्रकारे करणार काम सुरु

हे देखील वाचा