अभिनेत्री कंगना रणौत लवकरच होणार पंतप्रधान, अशाप्रकारे करणार काम सुरु


मुंबई | बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ कंगना रणौत पुन्हा एकदा एका राजकीय नाट्य असलेल्या चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगनाने ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. मात्र, इंदिरा गांधी यांच्यावर बनत असलेल्या या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. हा चित्रपट साई कबीर दिग्दर्शित करणार आहेत. तसेच, हा चित्रपट इंदिरा गांधींची बायोपिक नाही.

कंगना रणौतने ट्विट केले की, ‘माझा प्रिय मित्र साई कबीर आणि मी एका राजकीय चित्रपटासाठी एकत्र काम करत आहोत हे सांगताना मला आनंद होत आहे. याचे दिग्दर्शन मणिकर्णिका फिल्म्ससारखे करण्यात येईल. साई कबीर हेच या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.’

यापूर्वी कंगना रणौतने एका फॅन पेजच्या ट्विटला रिट्विट करत असे लिहिले होते की, ‘हे माझे आयकॉनिक स्त्रीचे फोटोशूट आहे, जे मी माझ्या करिअरच्या सुरूवातीस केले होते. मला माहित नव्हते की एक दिवस मला त्यांची भूमिका पडद्यावर साकारण्याची संधी मिळेल.’ कंगना रनौतने शेअर केलेल्या ट्विटमध्ये ती इंदिरा गांधींच्या लूकमध्ये दिसली आहे. मात्र, इंदिरा गांधी यांच्यावरील चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही.

कंगना रणौतच्या ‘थलाइवी’नंतर हा दुसरा राजकीय चित्रपट असेल. कंगनाने सांगितल्याप्रमाणे, अद्याप चित्रपटाचे शीर्षक निश्चित झाले नाही आणि हा चित्रपट इंदिरा गांधींचा बायोपिकदेखील नसेल. या चित्रपटात आणखी दिग्गज कलाकार दिसणार आहेत. आणिबाणी आणि ऑपरेशन ब्ल्यू स्टारदेखील या चित्रपटात दाखवण्यात येतील.

कंगनासोबत याअगोदर ‘रिव्हॉल्व्हर रानी’मध्ये काम करणारे दिग्दर्शक साई कबीर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून त्यांनीच चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली आहे. हा चित्रपट भव्य स्तरावर बनणार आहे, यात संजय गांधी, राजीव गांधी, मोरारजी देसाई, लाल बहादूर शास्त्री अशा अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा दाखवण्यात येणार आहे.

यापूर्वी कंगना रणौतने ‘मणिकर्णिका रिटर्न्स’ हा चित्रपट बनवण्याची घोषणा केली होती. यावर, ती जानेवारी 2022 पासून शूटिंगला सुरूवात करणार आहे. हा चित्रपट काश्मीरच्या दहाव्या शतकातील राणी दिद्दावर आधारित आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.