Wednesday, April 23, 2025
Home अन्य लग्नानंतरच्या पार्टीत गर्ल गँगसोबत टेबलावर चढून मौनी रॉयने केला जबरदस्त डान्स, व्हिडिओ होतोय व्हायरल

लग्नानंतरच्या पार्टीत गर्ल गँगसोबत टेबलावर चढून मौनी रॉयने केला जबरदस्त डान्स, व्हिडिओ होतोय व्हायरल

अनेक मालिकांमधून नावारूपास आलेली अभिनेत्री मौनी रॉयने (Mouni roy) नुकतेच तिचा बॉयफ्रेंड सूरज नांबियार याच्यासोबत लग्न केले आहे. लग्नानंतर मौनी रॉयचा आफ्टर पार्टी डान्स व्हायरल होत आहे. नवीन वधूचा जबरदस्त डान्स, मुलींच्या गँगसोबत टेबलावर उभं राहून डान्स करताना दिसली. मौनीचा तिच्या गर्ल गँगसोबतचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. लग्नाच्या सेलिब्रेशनमध्ये मग्न झालेल्या मौनीने तिच्या लग्नात खूप धमाल केली. त्यांच्या लग्नाचे अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. मात्र या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

काळ्या आणि पांढर्‍या रंगाच्या लॉंन्ग गाउनमध्ये, नवविवाहित वधू टेबलवर चढून नाचताना दिसली. मौनी आणि तिच्या गर्ल गँगने इम्रान खानच्या ‘ऍम्प्लिफायर’ गाण्यावर डान्स केला आहे. हा व्हिडिओ पाहून चाहते मौनीवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. मौनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आणि मौनीच्या चाहत्यांनीही हा व्हिडिओ जोरदार शेअर करायला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर लग्नानंतर पहिल्यांदाच मौनी रॉयचा विवाहित लूक पाहायला मिळाला आहे. (mouni roy dance video after wedding party)

लग्नानंतर पहिल्यांदाच मौनी सूट सलवारमध्ये नाही तर हिरव्या रंगाच्या टाइट फिट चमकदार गाऊनमध्ये दिसली आहे. हिरव्या गाऊनमध्ये मिसेस नांबियार एखाद्या जलपरीपेक्षा कमी दिसत नव्हत्या. मौनीचा लूक अधिक खास बनवण्यासाठी मौनीच्या मागणीनुसार तिच्या हातात सिंदूर आणि मेहंदीने सजवलेल्या बांगड्या होत्या.

मौनी आणि सूरजने गुरुवारी(२७ जानेवारी) सकाळी मल्याळम आणि संध्याकाळी बंगाली रितीरिवाजांमध्ये थाटामाटात लग्न केले. मौनीने लाल रंगाचा लेहेंगा घातला होता ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. मौनी आणि सूरजच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत. तसे, मौनी रॉयला अनेक वेळा टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये वधूच्या भूमिकेत पाहिले गेले आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा