×

करीना कपूरसोबतच्या वादावर अमिषा पटेलने तोडले मौन, २२ वर्षांनंतर अभिनेत्रीने सांगितले सत्य

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार असतात ज्यांचे अनेकवेळा भांडण झाल्याचे ऐकायला येते. काहीवेळा ही भांडणं खरी असतात तर काहीवेळा मात्र छोट्या छोट्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. अशीच काही वर्षांपूर्वी दोन अभिनेत्रींनबद्दल भांडणांची कुरबुर ऐकू येत होती. त्या अभिनेत्री म्हणजे अमिषा पटेल (Amisha patel) आणि करीना कपूर(kareena kapoor). अमिषा पटेल आणि करीना कपूर खान यांच्यात २००० मध्ये कथित वाद झाला होता. यावर अमिषाने २२ वर्षांनंतर प्रतिक्रिया दिली आहे.

तिने सांगितले की, करिनाने तिला काय सांगितले हे तिला माहिती नाही. त्यांचं म्हणणं होतं की, त्यांच्यात भांडण झालं नव्हते, तरी देखील त्यांच्या भांडणाच्या बातम्या पसरवल्या जात होत्या. त्यांच्यातील वाद कोणापासून लपून राहिलेला नाही. हा वाद आताचा नाही तर २२ वर्षांचा आहे. खरंतर, अमिषा पटेलचा डेब्यू चित्रपट ‘कहो ना प्यार है’ पहिल्यांदा करीना कपूरला ऑफर झाला होता. पण करिनाने काही कारणास्तव हा चित्रपट करण्यास नकार दिला होता, त्यानंतर अमिषाची त्यात ऋतिक रोशनसोबत काम करण्यासाठी निवड झाली. हा चित्रपट सुपरहिट ठरला. लोकांना ऋतिक आणि अमिषाची जोडी खूप आवडली. पण करिनाला अमिषाचा अभिनय आवडला नाही. (ameesha patel react on fight with kareena kapoor khan)

करीना कपूरने २००० मध्ये अमिषा पटेलला ‘वाईट अभिनेत्री’ म्हटले होते. इतकंच नाही तर अमिषा आणि तिच्या अभिनयाविषयी आणखी खूप काही बोलली. आता अमिषाने एका मुलाखतीत या वादांवर प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली की, लोकांनी अशा गोष्टी निर्माण केल्या ज्या कधीच नव्हत्या. एका मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार, अमिषाने सांगितले की, त्यांच्यात असा वाद झालाच नव्हता.

अमिषा पटेल म्हणाली , “मला कोणीही शत्रू नाही. खरंच, जेव्हा करीना एखाद्या गाण्यात किंवा चित्रपटात अप्रतिम दिसते आणि उत्तम परफॉर्मन्स देते, तेव्हा मी माझ्या जवळच्या मित्रांना सांगते , ‘व्वा, तिने अप्रतिम काम केले’. मला वाटते की, ती एक अतिशय सुंदर स्त्री आहे, एक अप्रतिम अभिनेत्री आहे आणि मला तिच्याविरुद्ध काहीही नाही.”

त्यावेळी करीनाच्या कथित कमेंटवर मीडियाने तिला प्रतिक्रिया मागितल्याचे अमिषा पटेलने सांगितले. ‘कहो ना प्यार है’ मध्ये अमिषाला पाहिल्यानंतर करिनाने तिला वाईट अभिनेत्री म्हटले होते. अमीषा म्हणाली, “मी म्हणाले की, माझ्याकडे कोणतीही प्रतिक्रिया नाही. मला त्याच्याबद्दल फक्त सकारात्मक गोष्टी सांगायच्या आहेत कारण मला या गोष्टी चांगल्या प्रकारे माहित नाहीत.”

अमिषा पटेल पुढे म्हणाली, “मला फक्त तिचे तिच्याबद्दलचे काम माहित आहे आणि मला वाटते की, ती खूप चांगली आहे. तिचे माझ्याबद्दल काही निश्चित मत असेल? हे ठीक आहे, तिला तिचे हक्क दिले पाहिजे.” आता तिच्या या प्रतिक्रियेनंतर आता ज्यांच्या मनात प्रश्नचिन्ह उभे राहिले होते त्यांना मात्र त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली.

हेही वाचा :

Latest Post