Monday, January 13, 2025
Home बॉलीवूड ऋतिक रोशनसोबत दिसणारी ‘मिस्ट्री गर्ल’ सबा आझाद कोण तरी आहे? समोर आली ‘ही’ माहिती

ऋतिक रोशनसोबत दिसणारी ‘मिस्ट्री गर्ल’ सबा आझाद कोण तरी आहे? समोर आली ‘ही’ माहिती

बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन (Hrithik Roshan) शुक्रवारी (२८ जानेवारी) रात्री एका मुलीचा हात धरून मुंबईतील एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसला होता. त्यामुळे ऋतिक सध्या त्याच्या नात्यामुळे चर्चेत आहे. पॅपराझींनी ऋतिकला एका मिस्ट्री गर्लसोबत रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना पाहिल्यानंतर त्यांनी त्याला पोझ देण्यासाठी थांबवले. परंतु तो त्या मुलीचा हात धरून कारमध्ये बसला. जेव्हा ऋतिकचे मिस्ट्री गर्लसोबतचे फोटो व्हायरल झाले तेव्हा चाहते त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक झाले.

माध्यमांतील वृत्तानुसार, ऋतिकसोबत दिसलेल्या मुलीचे नाव सबा आझाद (Saba Azad) आहे. ऋतिक आणि सबा आझादचे नाते काय आहे हे चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे. सबा आझाद एक संगीतकार आणि गीतकार देखील आहे. ऋतिकने (Hrithik Roshan) दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर सुजैन खानशी लग्न केले होते. ऋतिकला सुजैनपासून रिहान आणि ह्रदान रोशन नावाची दोन मुले आहेत.

सबा आझादने ‘दिल कबड्डी’ चित्रपटातून केले पदार्पण
सबा ३२ वर्षांची आहे. २००८ मध्ये आलेल्या ‘दिल कबड्डी’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. ती २०११ मध्ये साकिब सलीमसोबत ‘मुझसे फ्रेंडशिप करोगे’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटानेही प्रेक्षकांची निराशा केली.

सबा आझादने काही चित्रपटात केले आहे काम
सबा आझादने आतापर्यंत ४-५ चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती शेवटची ‘फील्स लाइक इश्क’ या चित्रपटात दिसली होती. ऋतिक रोशन सबा आझादसोबतच्या नात्याला कुठल्या टप्प्यावर नेणार हा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे.

ऋतिक सैफ आणि राधिका आपटे एकत्र दिसणार आहे ‘विक्रम वेध’मध्ये
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ऋतिक रोशन लवकरच सैफ अली खान आणि राधिका आपटे यांच्यासोबत ‘विक्रम वेधा’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. याशिवाय दीपिका पदुकोणसोबत ‘फायटर’ चित्रपटात ऋतिक रोशन प्रेक्षकांना दिसणार आहे.

हेही वाचा :

‘बिग बॉस १५’ ला मिळाली विजेती स्पर्धक, ट्रॉफीवर कोरले तेजस्वी प्रकाशचे नाव

शाहिद आणि मीराची जोडी पुन्हा एकदा आली चर्चेत, सोशल मीडियावर व्हायरल होतोय नवा फोटो

‘हे’ आहेत आलिया भट्टच्या करिअरला कलाटणी देणारे सुपरहिट चित्रपट, वाचा संपूर्ण यादी

 

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा