Monday, May 4, 2026
Home बॉलीवूड एका ‘मिस्ट्री गर्ल’सोबत हातात हात घेऊन फिरताना दिसला ऋतिक रोशन, डेटिंगच्या बातम्यांनी धरला जोर!

एका ‘मिस्ट्री गर्ल’सोबत हातात हात घेऊन फिरताना दिसला ऋतिक रोशन, डेटिंगच्या बातम्यांनी धरला जोर!

बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन (Hrithik Roshan) शुक्रवारी (२८ जानेवारी) रात्री एका महिलेचा हात धरून मुंबईतील एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसला. वांद्रे येथील कॅफेमधून ऋतिक बाहेर आला, तेव्हा त्याने त्याच्यासोबत चालणाऱ्या तरुणीचा हात धरला. पॅपराझींनी तिचे फोटो काढले आणि व्हिडिओ रेकॉर्ड केला, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऋतिक रोशन आणि त्याच्यासोबत आलेल्या मुलीने मास्क घातले होते. आता हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सोशल मीडियावर केली जात आहे.

ऋतिक रोशनची नवी गर्लफ्रेंड
ऋतिकने दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर सुजैन खानशी लग्न केले होते. ऋतिकला सुजैनपासून ऋहान आणि ऋदान रोशन नावाची दोन मुले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून कमेंट सेक्शनमध्ये चाहते त्या मुलीला ऋतिकची नवीन गर्लफ्रेंड असल्याचे सांगत आहेत, तर अनेकजण मुलीच्या नावाबाबत अंदाज बांधत आहेत.

जोडपे हातात हात घालून दिसले
मात्र, व्हिडिओ पाहून असे दिसते की, ऋतिकला फोटोग्राफर्स तेथे उपस्थित राहून त्यांचे फोटो काढण्यात कोणतीही अडचण आली नाही. ऋतिक रेस्टॉरंटमधून बाहेर पडला आणि थेट त्याच्या कारच्या दिशेने निघाला. पण नंतर फोटोग्राफर्सना पाहून तो तिथेच थांबला. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे पॅपराझी बघूनही ऋतिकने मुलीचा हात शेवटपर्यंत धरला होता.

कारमध्ये बसल्यानंतर ऋतिक रोशन गेला निघून
ऋतिक रोशनने त्या मुलीला कारमध्ये बसण्यास मदत केली आणि त्यानंतर तिच्यासोबत त्याच कारमध्ये बसून तिथून निघून गेला. आतापर्यंत या मिस्ट्री महिलेचे नाव समोर आलेले नाही. पण काही सोशल मीडिया पोस्टनुसार ऋतिक लिरिक्स राइटर सबा आझादला डेट करत आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा