Friday, December 27, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘सिडनाझ’च्या नात्यावर राखी सावंतने केलं विधान, पाहा काय म्हणाली एंटरटेनमेंट क्वीन!

अलीकडेच ‘बिग बॉस १५’च्या फिनालेमध्ये शहनाझ गिल (Shehnaaz Gill) सिद्धार्थ शुक्लाला (Siddharth Shukla) श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहचली होती. यादरम्यान तिने जबरदस्त परफॉर्म केला, पण सिद्धार्थ शुक्लाची आठवण येताच तिला अश्रू आवरता आले नाहीत. त्याचवेळी राखी सावंत (Rakhi Sawant) शहनाज आणि सिद्धार्थ शुक्लाबाबत असं काही बोलली की, तिचं हे वक्तव्य आता चर्चेत आलं आहे.

‘रॉकस्टार आहे शहनाझ’
मीडियाशी बोलताना राखी सावंत म्हणाली की, “शहनाझ एक रॉकस्टार आहे. ती भारताच्या हृदयाचा ठोका आहे. चल शेहनाझ…चिअर अप… आता विस्फोट धमाका कर. जसा तू ‘बिग बॉस १५’ च्या फिनालेमध्ये केला होता.” (rakhi sawant reaction on shehnaaz gill and sidharth shukla)

यासोबतच राखी सावंत म्हणाली की, “आम्ही सिद्धार्थ शुक्लाला कधीच विसरणार नाही. तो आमच्या हृदयात आणि मनात आहे. तो आपल्यासोबत आहे, तो कुठेही गेलेला नाही.”

शहनाझला अश्रू अनावर
‘बिग बॉस १५’च्या फिनालेमध्ये शहनाझ स्टेजवर येताच सिद्धार्थ शुक्लाची आठवण करून ती रडू लागली. यानंतर सलमान खानने शहनाझ गिलला मिठी मारली आणि तिला सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो स्वतःही रडू लागला.

सिद्धार्थला वाहिली आदरांजली
फिनालेमध्ये शहनाझ गिलने एका गाण्यावर परफॉर्म केला. हे गाणे तेच आहे, जे शहनाझने काही दिवसांपूर्वी सिद्धार्थला समर्पित केले होते. या गाण्याचे बोल आहेत, ‘तू यहीं है.’

शहनाझ गिलचे वर्कफ्रंट
शहनाज गिलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर अभिनेत्री गेल्या वर्षी ‘हौंसला रख’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात शहनाज गिलने अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझसोबत स्क्रीन शेअर केली होती. तिचा हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला. या चित्रपटात शहनाज गिलने दिलजीतची पत्नी स्वीटीची भूमिका साकारली होती. जी आपल्या मुलाला आणि नवऱ्याला सोडून आपल्या स्वप्नाकडे धावते. यातील तिच्या अभिनयाने बरीच वाहवा मिळवली.

हेही वाचा-

हे देखील वाचा