उत्तराखंडमध्ये रविवारी (७ फेब्रुवारी) आलेल्या आपत्तीने अनेक लोक संकटात सापडले आहेत. त्यामुळे आता बॉलिवूडमधील कलाकारांनी या संकटात सापडलेल्या लोकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. यामध्ये सुपरस्टार अक्षय कुमार, अजय देवगण, खासदार आणि अभिनेता सनी देओल, तापसी पन्नू आणि सोनू सूद यांसारख्या अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे.
झाले असे की, जोशीमठमध्ये नंदादेवी नाव असलेल्या हिमकड्याचा (ग्लेशियर) एक मोठा भाग तुटल्यामुळे धौली गंगा नदीमध्ये अचानक महापूर आला. या कारणामुळे तेथील हिमालयीन भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत ऋषी गंगा ऊर्जा प्रकल्पात काम करणारे ५० ते १०० कामगार मजूर बेपत्ता झाले आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारत- तिबेट सीमा पोलीस, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि इतर पूरनियंत्रक दल युद्ध पातळीवर मदत आणि बचाव कार्य करत आहेत.
यादरम्यान अक्षय कुमारने ट्वीट करत लिहिले की, “उत्तराखंडमध्ये हिमकडा तुटल्याचे भयानक दृश्य, सर्वांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करतो.”
Terrifying visuals of the glacier burst in #Uttarakhand, thoughts and prayers for everyone’s safety ????????
— Akshay Kumar (@akshaykumar) February 7, 2021
सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) चे अध्यक्ष आणि लेखक प्रसून जोशी यांनी म्हटले की, ‘त्यांना आशा आहे की, चमोली आणि उत्तराखंडचे इतर जिल्हे ग्लेशियर तुटले असले तरीही सुरक्षित राहतील. तसेच कोणाच्याही जीवाला धोका नसेल.’
Hoping that Chamoli and other districts of #Uttarakhand stay as safe from the glacier burst and no lives are endangered . Prayers and strength for the people , the authorities and rescue teams.
— Prasoon Joshi (@prasoonjoshi_) February 7, 2021
चित्रपट निर्माता रॉनी स्क्रूवालाने म्हटले की, “ही दुर्घटना निसर्गाचे एक भयानक दृश्य होते.” सोबतच त्याने हवामान बदलाविषयी लोकांचा असंवेदनशील दृष्टीकोन लिहिला.
Force of nature – saddened to see a disaster unfolding #Uttarakhand – except that with all our callous approach to climate change/ global warming – not sure we can call these ‘natural disasters’ anymore !!
— Ronnie Screwvala (@RonnieScrewvala) February 7, 2021
अजय देवगणने लिहिले की, तो आशा करतो की आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) टीम अधिकाधिक लोकांना वाचवण्यात यशस्वी होईल. त्याने ट्वीट करत म्हटले की, “या कठीण काळात माझ्या प्रार्थना उत्तराखंडच्या लोकांसोबत आहेत.”
Is it our worst fears on climate extremes that are closing in on us? My thoughts & prayers are with the people of #Uttarakhand at this crucial hour. Hope we rescue as many as possible ????????
— Ajay Devgn (@ajaydevgn) February 7, 2021
पर्यावरणाच्या मुद्द्यांबाबत आवाज उठवणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर म्हणाली की, हिमालयात मानवनिर्मित बांधकामेही या शोकांतिकेत सामील आहेत. तिने ट्वीट करत म्हटले की, “उत्तराखंडमध्ये हिमकडा तुटल्याचे ऐकल्याने चिंतेत आहे. तेथील सर्व लोकांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करत आहे.”
Distressing to hear about the glacier breaking off in #Uttarakhand Praying everyone’s safety there ????
— Shraddha (@ShraddhaKapoor) February 7, 2021
सोबतच अभिनेता सोनू सूदनेही ट्वीट करत म्हटले की, “उत्तराखंड आम्ही तुमच्या सोबत आहोत.”
उत्तराखंड हम आपके साथ हैं।
— sonu sood (@SonuSood) February 7, 2021
तापसी पन्नूने म्हटले की, “या ‘मानवी प्रेरित दुर्घटना’ डोळ्यासमोर पाहून वाईट वाटतं.”
Man induced disasters. Hurtful to watch this. Nature is getting back at us for toying with it. #UttarakhandDisaster https://t.co/THwBIQbFXC
— taapsee pannu (@taapsee) February 7, 2021
तसेच खासदार आणि अभिनेता सनी देओलने म्हटले की, “उत्तराखंडसाठी प्रार्थना करा.”
Pray for #Uttarakhand
— Sunny Deol (@iamsunnydeol) February 7, 2021
अभिनेत्री रेणुका शहाणेने यादरम्यान लोकांना आवाहन केले आहे की, अफवांवर ध्यान देऊ नये आणि ‘निराधार व्हिडिओ’ पसरवू नका.
Prayers for Uttarakhand ???????????????? Please do not spread any rumors or unsubstantiated videos ????????????????#Chamoli #GlacierBurst
— Renuka Shahane (@renukash) February 7, 2021
मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने लिहिले की, “उत्तराखंडमध्ये सर्व लोकांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करा आणि आयटीबीपीच्या जवानांना त्यांच्या शौर्यासाठी सलाम.”
Prayers for everyone’s safety in #Uttarakhand – a big salute to the #ITBP personnel for their bravery.
— Riteish Deshmukh (@Riteishd) February 7, 2021
Prayers for everyone’s safety in #Uttarakhand.
.
If you are stuck in any affected areas and need any kind of help, please contact Disaster Operations Center number at 1070 or 9557444486.— Sidharth Malhotra (@SidMalhotra) February 7, 2021
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रानेही ट्वीट करत हेल्पलाईन नंबर शेअर केले आहेत.
हेही वाचा-
होय, भारतात असं होतंच… जेव्हा गाण्यातील शब्दांमुळे रातोरात बदलावी लागली ‘ही’ गाणी; पाहा यादी