बिकिनी घालणारी भारतातील पहिली अभिनेत्री ‘शर्मिला’, ‘त्या’ फोटोंनी सर्वत्र अक्षरशः धुमाकूळ घातला होता!

शर्मिला टागोर यांनी हिंदी सिनेसृष्टीत अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. मात्र, त्यांना त्यांच्या अभिनयासोबतच बोल्डनेससाठी देखील ओळखले जाते.


शर्मिला टागोर या हिंदी सिनेसृष्टीतील एक एव्हरग्रीन अभिनेत्रींपैकी एक आहेत. शर्मिला यांचा ८ नोव्हेंबर १९४६ रोजी झाला. शर्मिला आज त्यांचा ७४ वा वाढदिवस साजरा करत आहे. शर्मिला यांचे आजही असंख्य फॅन्स आहे.

शर्मिला यांनी मंसूर अली खान पतौडी यांच्याशी १९६९ ला लग्न केले. शर्मिला यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक अविस्मरणीय चित्रपट केले. शर्मिला यांना त्यांच्या अभिनयासोबतच त्यांना बोल्डनेस साठी देखील ओळखले जाते.

आज आम्ही बोंबाबोंबच्या प्रेक्षकांना शर्मिला यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या बिकिनी शूटिंगचा किस्सा सांगणार आहोत.

शर्मिला यांच्या अनेक चित्रपटांपैकी ‘एन इव्हनिंग इन पॅरिस’ या सिनेमात त्यांनी पहिल्यांदाच बिकिनी घालून सीन केला. त्या बिकिनी घालून सीन देणाऱ्या भारतीय सिनेमातल्या पहिल्या अभिनेत्री ठरल्या. या बिकिनी सीननंतर संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये एकच धमाका झाला. फक्त बॉलीवूड नाही तर संसदेत सुद्धा यावर अनेक चर्चा झाल्या.

Sharmila Tagore
Sharmila Tagore

सन १९६८ मध्ये शर्मिला यांनी एका मासिकाच्या कव्हर पेजसाठी बिकिनी घालून शूट केले होते. तेव्हा मन्सूर पतौडी आणि शर्मिला टागोर रिलेशनशिपमध्ये होते. नेमके तेव्हाच मन्सूर यांच्या आई शर्मिला यांना भेटायला येणार होत्या आणि त्यांच्या बिकिनी शूटच्या फोटोंचे बॅनर संपूर्ण शहरात लावले होते.

यानंतर मात्र, मन्सूर अली खान पतौडी यांना शर्मिला यांच्या बिकिनी घालण्यावरून कोणतीही आपत्ती नव्हती. मन्सूर यांना शर्मिला यांचे प्रोफेशन आणि त्यासाठी असे शूट हे सर्व मान्य होते.  मात्र, तरीही शर्मिला खूप चिंतेत होत्या, कारण त्यांना वाटत होते की मन्सूर यांच्या आईनी ते बॅनर पहिले तर काय होईल.

sharmila tagore mansoor ali khan
sharmila tagore mansoor ali khan

त्यामुळे तेव्हा शर्मिला यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांना संपूर्ण शहरातील बॅनर काढून टाकण्याची विनंती करून ते बॅनर काढले.  शर्मिला यांनी त्यांचे आणि मन्सूर अली यांचे नाते टिकवायचा प्रत्येक प्रयत्न केला आणि तो प्रयत्न यशस्वी झाला.


Leave A Reply

Your email address will not be published.