बॉलिवूडमध्ये अनेक फॉरेन अभिनेत्री आहेत ज्यांनी त्यांचे नशीब आजमावले आहे. काही अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये खूप मोठा प्रवास करतात, तर काही अभिनेत्रींचा प्रवास दोन तीन चित्रपटापुरता मर्यादित राहिला. यातील एक नाव म्हणजे बारबरा मोरी होय.
बारबराने ऋतिक रोशन (hrithik roshan) आणि कंगना रणौत (kangana ranaut) यांच्या ‘काईटस्’ या चित्रपटातून तिच्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली होती. परंतु या नंतर ती कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. तिने अनेक ‘मक्सीकन’ चित्रपटात देखील काम केले आहे. तसेच ती हॉलिवूडमध्ये देखील खूप लोकप्रिय आहे. तिचा जन्म २ फेब्रुवारी, १९७८ मध्ये झाला. (Hrithik Roshan actress barbara become grand mother)
ऋतिक रोशन सोबतच तिची ऑनस्क्रिन केमिस्ट्री सगळ्यांना खूप आवडली होती. सगळीकडे त्या दोघांचे कौतुक चालले होते. तसेच ते दोघे रिलेशनमध्ये होते अशा देखील चर्चा चालल्या होत्या. परंतु बारबरा आधीपासूनच रिलेशनमध्ये होती. त्यामुळे त्या बातम्यांनी जास्त वेग घेतला नाही.
तिच्या या रिलेशनमधून तिला सेरगो मयेर मोरी नावाचा एक मुलगा देखील आहे. आता तिचा हा मुलगा मोठा झाला आहे आणि त्याला आता एक मुलगी देखील आहे. अशाप्रकारे ‘काईटस्’ चित्रपटाची अभिनेत्री ३८ व्या वर्षी आजी झाली आहे. आता ती ४४ वर्षाची आहे. तिच्या रिलेशननंतर तिने बास्केटबॉल प्लेअर केनेथ रॉय सिंगमनसोबत लग्न केले.
लग्नाच्या एक वर्षानंतर म्हणजेच २०१७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. वयाच्या ४४ व्या वर्षी देखील ती खूप फिट आहे. सोशल मीडियावर तिची तगडी फॅन फॉलोविंग असल्याने तिचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात.
हेही वाचा :
- दीपिका पदुकोणवर प्रश्न केल्याने भडकली कंगना रणौत, संतापून दिले उत्तर, म्हणाली ‘तुम्ही तर बसा…’
- पत्रकाराने अभिनेत्री नेहा शेट्टीच्या शरीरावर तिळाबद्दल विचारला प्रश्न, जोरदार उत्तर देत अभिनेत्रीने फटकारले
- ‘त्या माजोरड्यांना मेसेज गेला पायजे, ‘मराठी कलाकार’ नडला तर तुमचा बाजार उठवंल!’ किरण मानेंची पोस्ट चर्चेत