Friday, September 18, 2026
Home बॉलीवूड पत्रकाराने अभिनेत्री नेहा शेट्टीच्या शरीरावर तिळाबद्दल विचारला प्रश्न, जोरदार उत्तर देत अभिनेत्रीने फटकारले

पत्रकाराने अभिनेत्री नेहा शेट्टीच्या शरीरावर तिळाबद्दल विचारला प्रश्न, जोरदार उत्तर देत अभिनेत्रीने फटकारले

अभिनेत्री नेहा शेट्टी (Neha Shetty) लवकरच विमल कृष्णाच्या तेलुगू चित्रपट ‘डीजे टिल्लू’मध्ये दिसणार आहे. ज्यामध्ये तिच्यासोबत अभिनेता सिद्धू जोन्नालगड्डा दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आणि यादरम्यान दोन्ही कलाकारांनी मीडियाला संबोधित करत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. कार्यक्रमात एका पत्रकाराने अभिनेता सिद्धूला नेहाबद्दल एक विचित्र प्रश्न विचारला, ज्यामुळे नेहा भडकली. एवढेच नाही, तर नेहाने तिच्या या उत्तराने पत्रकाराचे बोलणेही बंद केले.

हैदराबादमध्ये बुधवारी (२ फेब्रुवारी) नेहाच्या (Neha Shetty) ‘डीजे टिल्लू’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला असून, याच कार्यक्रमाला चित्रपटाचा निर्माता नागा वामसी व्यतिरिक्त संपूर्ण टीम उपस्थित होती. यावेळी सर्व पत्रकारांनी नेहा आणि सिद्धूला चित्रपटाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले, ज्यांना दोघांनीही छान उत्तरे दिली. पण याचदरम्यान एका पत्रकाराने ट्रेलरमध्ये दिसलेल्या एका डायलॉगचा हवाला देत सिद्धूला विचारले की, नेहाला किती तिळ आहेत ते तुम्ही मोजता का? यावर अभिनेत्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तो प्रश्न टाळायचा आहे, असे सांगून पुढे निघून गेला.

चाहते संतापले

पत्रकाराने विचारलेल्या या प्रश्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावर अनेकजण नाराजी व्यक्त करत आहेत. काही जणांनी याला पत्रकाराचा उद्धटपणा म्हटले, तर काहींनी हा अभिनेत्याचा अपमान केल्यासारखे असल्याचे म्हटले आहे.

अभिनेत्रीने केली पोस्ट

पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यानंतर नेहाने स्वतः हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आणि लिहिले की, “आज ट्रेलर लॉन्चदरम्यान हा प्रश्न खूप दुर्दैवी होता. पण मला असे म्हणायचे आहे की, ते स्वतःच्या घरात आणि कामाच्या ठिकाणी महिलांचा किती आदर करतात हे दिसून येते.”

या पोस्टवर कमेंट करत निर्माता नागा वामसीने नेहाची माफी मागितली आहे. त्याने लिहिले आहे की, “सॉरी नेहा, ही खरोखरच दुर्दैवी घटना होती.” त्याचवेळी सोशल मीडियावरील युजर्स पत्रकाराला बरंच काही सांगत आहेत. दुसरीकडे, चाहते नेहाचे कौतुक करत आहेत कारण तिने हे प्रकरण अतिशय शांतपणे हाताळले आहे. ‘डीजे टिल्लू’ हा चित्रपट फेब्रुवारीमध्येच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा