दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाने सध्या सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाच्या कथेने तर सर्वांना खुश केलेच आहे, मात्र चित्रपटातील गाण्यांनी तर अक्षरशः वेड लावले आहे. सगळीकडे सध्या चित्रपटातील ‘ओ अंटावा’ गाण्याचीच हवा पाहायला मिळत आहे. या गाण्यावर हजारो रिल्स सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. आता हिंदी चित्रपटसृष्टीचे दिग्गज अभिनेते अनुपम खेर यांना सुद्धा या गाण्यावर रिल्स बनवण्याचा मोह आवरता आला नाही. मात्र त्यांची ही रिल्स इतरांपेक्षा खूपच वेगळी आहे जे पाहून चाहते मात्र आनंदी झाले आहेत.
अल्लू अर्जुनच्या ‘ओ अंटावा’ गाण्याची क्रेज काही संपता संपेना झालीय या गाण्याने फक्त प्रेक्षकांनाच नव्हेतर सिनेसृष्टीतील दिग्ग्ज कलाकारांनाही प्रेमात पाडले आहेे. त्यामुळेच अनेक कलाकारांनी या गाण्यावर मजेदार रिल्स बनवले आहेत. आता हा मोह बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अनुपम खेर यांनाही आवरता आला नाही. सध्या सोशल मीडियावर अनुपम खेर यांचा ‘ओ अंटावा’ गाण्यावरील हटके व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. शुक्रवारी (४ फेब्रुवारी) अनुपम खेर यांनी ‘हम आपके है कौन’ आणि ‘ओ अंटावा’ गाण्याचा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंंटवर शेअर केला. हा व्हिडिओ अत्यंत मजेशीर पद्धतीने शेअर केला आहे.
Keeping with the trend.????An iconic song from #HumAapkeHaiKoun appreciates a very popular song from #Pushpa in its own inimitable style! Enjoy! ???????????? #Koka #AajHamareDilMei @alluarjun @Samanthaprabhu2 pic.twitter.com/fcP8Yh4xVf
— Anupam Kher (@AnupamPKher) February 4, 2022
या व्हायरल व्हिडिओच्या सुरुवातीला दिवंगत अभिनेत्री रीमा लागू दिसत आहेत. त्या ‘ओ अंटावा’ गाणे म्हणताना दाखवले आहे. या हिंदी गाण्याच्या व्हिडिओला ‘ओ अंटावा’ गाण्याचा आवाज देण्यात आला आहे. अनुपम खेर यांच्या व्हिडिओमध्ये आलोक नाथ, सलमान खान, माधुरी दिक्षीत , आणि स्वताः अनुपम खेर दिसत आहेत. ते सगळेजण अल्लू अर्जुनच्या गाण्यावर डान्स करण्याचा आनंद घेत आहेत असेच यामध्ये दाखवले आहे. या व्हिडिओला अनुपम खेर यांनी “सुरु असलेला ट्रेंड लक्षात घेता हम आपके है कौन या गाण्याला पु्ष्पाच्या ओ अंटावाशी जोडून आनंद साजरा करत आहोत तुम्ही ही सेलिब्रेट करा,” असे कॅप्शन दिले आहे. दरम्यान या आधीही या गाण्यावर अनेक मोठ्या कलाकारांनी व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये उमर रियाज, रश्मि देसाई, नेहा भासीन अशाव दिग्गज कलाकारांचा समावेश आहे.
हेही वाचा :