Wednesday, February 21, 2024

birthday special :जेव्हा सर्वांसमोर केला गेला अभिषेक बच्चनचा अपमान, मोठा स्टार येताच दिली ‘अशी’ वागणूक

एक स्टारकिड असूनही अभिषेक बच्चनला (Abhishek Bachchan) चित्रपटसृष्टीत अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. अभिषेक प्रत्येक चित्रपटात दमदार कामगिरी करतो, तरीही त्याचे वडील म्हणजेच मेगास्टार अमिताभ बच्चन यांना मिळालेले यश त्याला मिळू शकले नाही. यामुळेच त्याला तिरस्काराचा सामना करावा लागतो. काहीवेळा तर त्याला चुकीची वागणूकही दिली जाते. अभिषेक  रविवारी (5 फेब्रुवारी) त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. जाणून घेऊया त्याचा अपमान झालेला तो किस्सा.

चित्रपटांमधून दाखवला बाहेरचा रस्ता
अभिषेक बच्चनने नुकतेच त्याच्यासोबत झालेल्या भेदभावाबद्दल सांगितले. अभिनेत्याची काही उदाहरणे देताना सांगितले की, त्याला अनेकवेळा कोणतीही माहिती न देता चित्रपटांमधून काढून टाकले गेले. एका मुलाखतीत अभिषेकने सांगितले की, “एकदा मला चित्रपटातून काढून टाकले गेले आणि सांगितलेही नाही. जेव्हा मी शूटिंगला गेलो तेव्हा मी पाहिले की, दुसरा अभिनेता माझा सीन शूट करत आहे. मी तिथून निघून गेलो. मला चित्रपटामधून बाहेर काढले गेले आणि त्या लोकांनी माझा फोनही उचलला नाही. मला वाटते की हे सामान्य आहे. प्रत्येक अभिनेत्याला या टप्प्यातून जावे लागते. माझ्या वडिलांनीही असे दिवस पाहिले आहेत.” (abishek bachchan celebrate his birthday, lets know some fact)

समोरच्या रांगेतून उठवले
अभिषेक बच्चन पुढे म्हणाला, “माझ्यासोबत असेही घडले आहे की, जेव्हा मी एखाद्या मोठ्या कार्यक्रमाला गेलो होतो आणि मला सांगितले गेले की तू पुढच्या रांगेत बस. पण एक मोठा स्टार येताच मला उठून मागच्या रांगेत बसण्यास सांगण्यात आले. हा सर्व शोबिझचा भाग आहे. आपण हे सर्व वैयक्तिकरित्या घेऊ शकत नाही. पण आपण घरी परत येऊन झोपण्यापूर्वी, स्वतःला वचन देऊ शकतो की, मी आता खूप मेहनत करेन. मी त्यांच्यापेक्षा जास्त यशस्वी होईन आणि मग मला पुढच्या रांगेतून उठवून मागे बसवले जाणार नाही.”

अभिषेकचे चित्रपट
अभिषेक बच्चनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, अभिनेता अलीकडेच क्राइम-थ्रिलर ‘बॉब बिस्वास’ मध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसला, जो 2012 च्या ‘कहानी’ चित्रपटाचा स्पिन-ऑफ आहे. या चित्रपटातील अभिषेकच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. यापूर्वी अभिनेता ‘द बिग बुल’, ‘लुडो’ आणि ‘मनमर्जियां’चा भाग होता, जिथे त्याच्या दमदार अभिनयासाठी त्याचे कौतुक झाले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
VIDEO| तब्बल 50 वर्षानंतर मुमताज आणि धर्मेंद्र देओल पुन्हा एकत्र, पाहा व्हायरल व्हिडिओ

दोन बिहिनींच्या मध्ये असणाऱ्या ‘या’ लहान मुलाला ओळखलता का? आज आहे बॉलिवूडचा रॉयल स्टार

हे देखील वाचा