‘बिग बॉस १५’ स्पर्धक आणि अभिनेत्री शमिता शेट्टी (shamita shetty) लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. नुकतेच झालेल्या तिच्या ४३ व्या वाढदिवशी तिने याबाबत योजना केल्या आहेत. मागील काही दिवसांपासून मनोरंजन क्षेत्रात लगीन सराई चालू आहे. अनेक कलाकारांनी लग्न केले आहे. याच लग्नाच्या सराईत शमिता शेट्टीने देखील लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्रीने नुकतेच दिलेल्या एका मुलाखतीत या गोष्टीचा खुलासा केला आहे की, ती लग्न करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.
शमिता शेट्टी मागील काही दिवसांपासून अभिनेता राकेश बापटसोबत रिलेशनमध्ये असण्याच्या चर्चा आहेत. शमिता या आधी बिग बॉस ओटीटीवर देखील दिसली होती. तिथेच तिची भेट राकेश बापट सोबत झाली. तिथे त्यांची मैत्री झाली आणि मग त्याच मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. (Shamita Shetty will marry to Rakesh bapat this year said now I want to settle down)
तिने एका मुलाखतीत राकेश बापट आणि तिच्या रिलेशनबाबत वक्तव्य केले आहे. तिने त्यांच्या लग्नाबाबत देखील खुलासा केला आहे. तिने सांगितले की, तिला लवकर राकेश बापटसोबत लग्न करायचे आहे. तसेच तिने सांगितले की, “राकेशसोबत मी रिलेशन एन्जॉय करत आहे. या वर्षी लग्न करण्याची माझी इच्छा आहे.”
शमिता पुढे म्हणाली की, “याच वर्षी आम्ही लग्न करणार आहोत आणि यासाठी देव माझी साथ नक्की देईल. मला कोरोना आणि लॉकडाउन दरम्यान समजले की, मी किती एकटी आहे. मी खूप काळापासून सिंगल आहे आणि की माझे आयुष्य माझ्या मर्जीप्रमाणे जगले आहे.”
पुढे तिने सांगितले की, “बिग बॉस १५ दरम्यान मी राकेशपासून दूर राहिले आहे. त्यावेळी माझ्या मनात हा विचार येत होता की, राकेश अजूनही माझा बॉयफ्रेंड आहे का? मला असे वाटत होते की, तीन – चार महिने एखाद्या व्यक्तीला बदलायला खूप झाले. त्यामुळे मी सगळ्यांना विचारत होते की, तो अजूनही माझा बॉयफ्रेंड आहे की, तो पुढे निघून गेला? मला समजत नव्हते की, तो जर पुढे निघून गेला असेल तर मी काय करणार आहे?” त्यामुळे येणाऱ्या काळात शमिता शेट्टी बोहल्यावर चढणार आहे. यामुळे तिच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.
हेही वाचा :