ओटीटीवरील बिग बॉसचा पहिला सिझन खूपच गाजला. या बिग बॉसमधील स्पर्धक असणारी उर्फी जावेद बिग बॉस सुरु असताना देखील गाजली आणि आताही गाजताना दिसत आहे. बिग बॉसने उर्फीला चांगली ओळख मिळवून दिली. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर अगदी दररोजच उर्फी तिच्या अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत येत असते. टेलिव्हिजनवरील अभिनेत्री असलेल्या उर्फीला तिच्या कपड्यांमुळे आणि विचित्र ड्रेसिंग स्टाईलमुळे तुफान ओळख मिळाली. उर्फीला बऱ्याचदा तिच्या कपड्यांवरून ट्रोल देखील केले गेले. तरी देखील उर्फीने या ट्रोलिंगला भाव दिला नाही.
नुकतेच उर्फीला एका जिम बाहेर स्पॉट केले गेले. यावेळी देखील उर्फीने घातलेल्या कपड्यांमुळे ती चांगलीच चर्चेत आली मात्र यावेळेस चर्चा वेगळ्याच होत्या. नेहमीच आपल्या हटके कपड्यांमुळे चर्चेत येणारी उर्फी या वेळेस चर्चेत आली ती तिच्या सामान्य कपड्यांमुळे. हो, जिममध्ये जाणाऱ्या उर्फीने नॉर्मल जिममधील कपडेच घातलेले दिसले. यामुळेच तिचा व्हिडिओ आणि तिचा लूक मोठ्या प्रमाणावर लक्षवेधून घेत आहे. उर्फीने ट्रोलिंगला कंटाळून तिचा लूक बदलला असल्याचे सांगितले जात आहे.
उर्फी जेव्हा स्पॉट झाली तेव्हा तिने निळ्या रंगाचा जिम वेयर ड्रेस घातला होता आणि तिच्या हातात पाण्याची बाटली होती. या ड्रेसमध्ये ती तिचा कमनीय बांधा फ्लॉन्ट करताना दिसली. जिमबाहेर उर्फीला स्पॉट केल्यानंतर तिने फोटोग्राफर्सला भरपूर पोझ देत सर्वांशी गप्पा देखील मारल्या. यावेळी उर्फीच्या चेहऱ्यावरील ग्लोने देखील सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ती तिच्या व्यस्त वेळापत्रकात देखील स्वतःला उत्तम पद्धतीने फिट ठेवते. उर्फी ज्यावेळी जिममध्ये जात होती तेव्हा ती बिल्डिंगच्या आत जाताना तिचा तोल बिघडला आणि ती पडणार इतक्यात तिने स्वतःला सावरले. उर्फीला बघण्याची आणि फोटो काढणाऱ्यांची देखील खूपच गर्दी तिथे झाली होती. उर्फीने ‘बेपनाह’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘कसौटी जिंदगी की’ आदी मालिकांमध्ये काम केले असले तरी तिला ओळख सोशल मीडियाच्या मार्फतच मिळाली.
हेही वाचा-
शाॅकिंग! प्रसिद्ध गायिकेचा रहस्यमय मृत्यू, घरातच आढळलाय मृतदेह
अभिनेत्यापुर्वी अभियंता होता आत्माराम भिडे; केवळ अभिनयासाठी सोडली मोठ्या पगाराची नोकरी