Sunday, April 28, 2024

अभिनेत्यापुर्वी अभियंता होता आत्माराम भिडे; केवळ अभिनयासाठी सोडली मोठ्या पगाराची नोकरी

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltaah Chashmah) गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांमध्ये आपले खास स्थान टिकवून आहे. शोमधील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आवडते. हा शो तब्बल १३ वर्षांपासून प्रसारित होत आहे आणि आजही टीआरपीच्या यादीत हा शो नेहमी टॉपला असतो. या शोमधील प्रत्येक पात्र उत्तम अभिनय करते. आज आम्‍ही तुम्‍हाला गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम भिडेबद्दल (Atmaram Bhide) सांगणार आहोत.

मंदार चांदवडकर (Mandar Chandwadkar) यांना अभिनयाची आवड पहिल्यापासूनच होती, पण प्रत्यक्षात ते खूप शिकलेले आणि व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनिअर होते. त्यांनी अनेक वर्षे दुबई येथे एमएनसीमध्येही काम केले. पण एवढं मोठं काम करूनही त्यांचा अभिनयाचा मोह सुटला नाही. अभिनय हा त्यांचा छंद होता. दुबईत काम करत असतानाच अभिनय करायला हवा, हे त्यांच्या लक्षात आले आणि नोकरी सोडल्यानंतर ते दुबईहून भारतात परतले.

मायदेशी परतल्यानंतर मंदार चांदवकर पहिल्यांदा रंगभूमीवर आले. त्यांनी रंगभूमीपासून अनेक नाटके केली. त्यांनी सुरुवातीच्या काळात मराठी मालिका केल्या आणि हळूहळू त्यांचा अभिनयही बहरत गेला. शेवटी २००८ मध्ये त्यांना ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये काम करण्याची संधी मिळाली. ही परिपूर्ण संधी त्यांनी सोडली नाही. त्यांनी शोच्या पात्राबद्दल तपशीलवार माहिती घेतली आणि लगेचच मालिकेला होकार दिला.

सोनालिका जोशी (Sonalika Joshi) जी या मालिकेत त्यांची पत्नी माधवीची भूमिका साकारत आहे, तिच्यामुळेच मंदार यांना हा शो मिळाला. दोघांनी यापूर्वीही एकत्र काम केले आहे. सोनालिका जोशीने निर्मात्यांना त्यांचे नाव सुचवले आणि आत्माराम भिडे यांच्या भूमिकेसाठी मंदार चांदवकर यांना फायनल करण्यात आले.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत काम करताना मंदार चांदवकरला आता १३ वर्षांहून अधिक वर्षे उलटून गेली आहेत. आता या व्यक्तिरेखेतून त्यांना एवढी प्रसिद्धी मिळाली आहे की, लोक त्यांना आत्माराम भिडे या नावानेच ओळखू लागले आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा