Sunday, February 23, 2025
Home बॉलीवूड विद्यार्थ्यांसोबत गणेश आचार्य यांच्या ‘कच्चा बादाम’ गाण्यावर हुक स्टेप्स, व्हिडिओ घालतोय सोशल मीडियावर धुमाकूळ

विद्यार्थ्यांसोबत गणेश आचार्य यांच्या ‘कच्चा बादाम’ गाण्यावर हुक स्टेप्स, व्हिडिओ घालतोय सोशल मीडियावर धुमाकूळ

सोशल मीडियावर अनेक गाणी व्हायरल होत असतात. सोशल मीडिया युजर्स त्या गाण्यांवर डान्स व्हिडिओ बनवून शेअर करत असतात. परंतु आपण पाहत असतो की, कोणीही नीट डान्स करत नाही. सोशल मीडियावर रश्मिका मंदान आणि अल्लू अर्जुन यांच्या ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ आणि ‘ऊ अंटवा’ गाणे चांगलेच व्हायरल होत आहे. तसेच यासोबत आणखी एक गाणे सध्या जबरदस्त गाजत आहे ते म्हणजे बंगाली ‘कच्चा बादाम.’

सोशल मीडियावर ‘ऊ अंटवा’ या गाण्याच्या हुक अप्स स्टेप्स अनेकांनी केल्या. परंतु तुम्हाला माहित आहे का? या गाण्याचे कोरीओग्राफर कोण आहेत? या गाण्याचे कोरीओग्राफर गणेश आचार्य हे आहेत. अशातच ‘ऊ अंटवा’ गाण्याचे कोरीओग्राफर गणेश आचार्य यांनी ‘कच्चा बादाम’ या गाण्यावर डान्स केला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Ganesh Acharya kachcha badam dance video viral on social media)

गणेश यांचा हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांचे स्टूडेंट देखील त्यांच्या सोबत डान्स करत आहेत. त्यांनी इंस्टाग्रामवर ‘कच्चा बादाम’ या गाण्याचे त्यांचे डान्स व्हर्जन व्हायरल केले आहे. हा व्हिडिओ शेअर करून त्यांनी लिहिले आहे की, “आता चालू असणाऱ्या ट्रेंडसोबत स्वतःला मॅच करण्याचा प्रयत्न करत आहे. ”

अनेकांना त्यांचा हा डान्स व्हिडिओ खूप आवडला आहे. त्यांचे अनेक चाहते या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. या गाण्यावर अनेक कलाकारांनी डान्स व्हिडिओ करून शेअर केला आहे. अशातच बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेदने देखील या गाण्यावर तिच्या अंदाजात डान्स केला आहे. या गाण्यात उर्फी रस्त्यावर डान्स करताना दिसत आहे. हे गाणे सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा