Tuesday, January 31, 2023

जेव्हा शत्रुघ्न सिन्हा स्वतःच्याच लग्नात पोहचले होते उशिरा, खुद्द अभिनेत्याने केला खुलासा

अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी 70-80 च्या दशकात त्यांच्या अभिनयाने सगळ्यांना अगदी वेड लावले होते. त्यांचा अभिनय सगळ्यांना खूप आवडत असे. परंतु अभिनयासोबत त्यांच्या इतर अनेक गोष्टींनी ते नेहमीच चर्चेत असायचे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणते ते साधारण कोणतीही गोष्ट वेळेवर करत नसायचे. याबाबत अनेक किस्से ऐकले आहेत. ते बऱ्याच ठिकाणी उशिरा जात असायचे. एखादा माणूस उशिरा जातो हे ठीक आहे पण जर तो माणूस स्वतः त्याच्या लग्नात उशिरा गेला तर…. हो! शत्रुघ्न सिन्हा हे खुद्द त्यांच्या लग्नात उशिरा पोहचले होते. याचा खुलासा देखील त्यांनी स्वतः केला आहे.

शत्रुघ्न सिन्हा यांनी या गोष्टीचा खुलासा केला होता की, ते त्यांच्या लग्नात 3 तास उशिरा पोहचले होते. त्यांनी सांगितले की, “मी वेळेला अजिबात किंमत देत नव्हतो. मी नेहमीच सेटवर उशिरा जात असायचो. ही‌ माझी सवय झाली होती. मी माझ्या लग्नात ३ तास उशिरा पोहचलो होतो.” 1980 मध्ये शत्रुघ्न सिन्हा यांनी अभिनेत्री पूनम चंदिरमानीसोबत लग्न केले होते. (Shatrughan Sinha had arrieved late in his own marriage, never cancelled the shooting of any film)

ते दोघे 5 वर्ष एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर ते लग्न बंधनात अडकले. शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले की, ते शूटिंग दरम्यान सेटवर देखील उशिरा पोहचत होते. त्यांनी सांगितले की, सेटवर उशिरा पोहचून देखील वेळेवर काम पूर्ण करण्यासाठी ते ओळखले जात होते. उशिरा जाऊन देखील ते वेळेवर त्यांचे काम पूर्ण करत असायचे.

शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले की, “मी कधीच कोणाला त्रास दिला नाही, तसेच नखरे देखील दाखवले नाही. हे देखील मी कधीच म्हणालो नाही की, मी शूटिंगच्या मूडमध्ये नाहीये. मला ताप जरी आला असला, तरी देखील मी सेटवर जात असायचो. आजारी असतानाच मी ‘मेरे अपने’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली होती.

शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांनी भेट पटणा ते मुंबई जाणाऱ्या ट्रेनमध्ये झाली होती. परंतु त्यावेळी ते रीना रॉयला डेट करत होते. शत्रुघ्न सिन्हा यांनी नंतर पूनम यांच्याशी लग्न केले. त्यांनी ‘पाकिजा’ चित्रपटातील एक डायलॉग कागदावर लिहून पूनम यांना प्रपोज केले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पूजा मिश्राचा शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर सेक्स स्कॅमचा आरोप, म्हणाली, ‘व्हर्जिनिटी विकून सोनाक्षी बनली स्टार’
मंडळी ओळखलंत का ‘या’ चिमुरडीला? आज आहे चाहत्यांची नॅशनल क्रश

हे देखील वाचा