कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) नेहमीच त्याच्या शोमुळे चर्चेत येत असतो. त्याचा शो सध्या तुफान गाजत आहे. कपिल अनेकदा त्याच्या शोमध्ये त्याच्या पत्नीचा गिन्नीचा उल्लेख करताना दिसतो. मात्र तो आणि त्याची पत्नी सार्वजनिक ठिकाणी खूपच कमी दिसतात. अशातच नुकतेच कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ (Ginni Chatrath) यांना मीडियाने स्पॉट केले. यावेळी कपिलने असे काही केले की, ज्यामुळे गिन्नी आणि कपिल हे सध्या मीडियामध्ये गाजताना दिसत आहे. नुकताच मुंबईमध्ये दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या ‘गहराइयां’ सिनेमाची स्पेशल स्क्रीनिंग (Gehraiyaan Screening) पार पडली. दीपिका पादुकोण (Deepika Padukone), सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi), अनन्या पांडे (Ananya Panday), धैर्य करवा (Dhairya Karwa) आदी कलाकारांच्या मुख्य भूमिका असलेला ‘गहराइयां’ सिनेमाच्या स्क्रीनिंग ला इंडस्ट्रीमधील अनेक मोठमोठे कलाकार उपस्थित होते. यावेळी कपिल शर्मा देखील पत्नी गिन्नी चतरथसोबत या स्क्रिनिंगला पोहचला.
यावेळी थिएटरच्या बाहेर मीडियाची खूपच गर्दी होती. सर्वच कलाकारांनी मीडियासमोर पोझ दिल्या. यावेळी कपिल आणि गिन्नी कॅमेऱ्यासमोर येताच एकच कल्ला झाला. यावेळी कपिलने अनपेक्षितपणे गिन्नीला डोक्याला किस केले. त्यांनतर गिन्नी काहीशी लाजली आणि ते दोघं सर्वांना अभिवादन करून निघून गेले. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत असून, त्यावर नेटकऱ्यांच्या देखील भरपूर प्रतिक्रिया येत आहेत. कपिलचा हा रोमँटिक अंदाज कमी वेळा पाहायला मिळत असतो. त्यामुळे त्याचा हा व्हिडिओ चांगलाच गाजत आहे.
नुकतेच कपिल आणि गिन्नी नेटफ्लिक्सच्या ‘आई एम नॉट डन यट’ या स्टँडअप स्पेशल भागात सोबत दिसले होते. या दोघांनी २०१८ साली धुमधडाक्यात लग्न केले. या दोघांना अनायरा आणि त्रिशान ही दोन मुलं आहेत. तत्पूर्वी शकुन बत्रा यांच्या ‘गहराइयां’ या सिनेमाच्या स्क्रीनिंगसाठी कपिल आणि गिन्नी यांच्याशिवाय सोनाक्षी सिन्हा, सोनी राजदान त्यांची मुलगी शाहीन भट्ट, कृति खरबंदा, रजत कपूर आदी अनेक कलाकार उपस्थित होते.
हेही वाचा :
वाढदिवस विशेष : चित्रपट फ्लॉप होणार इकबाल खानने गाजवले टेलिव्हिजन, जाणून घेऊया खास माहिती
‘श्रीवल्ल्ली’ गाण्याचा परदेशातही गाजावाजा, इंग्रजी व्हर्जन आले प्रेक्षकांच्या भेटीला