Monday, October 14, 2024
Home बॉलीवूड चित्रपटात रोमँटिक सीन देऊन प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे यश चोप्रा होते ‘या’ अभिनेत्रींच्या प्रेमात वेडे

चित्रपटात रोमँटिक सीन देऊन प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे यश चोप्रा होते ‘या’ अभिनेत्रींच्या प्रेमात वेडे

यश चोप्रा (yash chopra) हे हिंदी सिनेसृष्टीतील सर्नात यशस्वी दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या रोमँटिक चित्रपटांची चर्चा आजही आपल्याला पाहायला मिळत असते. त्यांचे प्रत्येक चित्रपट हे रोमान्स आणि प्रेमकथांनी भरलेले असायचे. त्यामुळेच त्यांना रोमान्स किंग अशी ओळख मिळाली होती. मात्र आपल्या चित्रपटाने सर्वांना प्रेमात पाडणारे यश चोप्रा हे स्वतः एका अभिनेत्रीच्या प्रेमात वेडे झाले होते हे खूप कमी लोकांना माहित आहे. आज त्याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत.

आपल्या दमदार आणि रोमॅंन्टिक चित्रपटांनी सर्वांना मोहित करणारे दिग्दर्शक म्हणून यश चोप्रा यांची ओळख आहे. मात्र यश चोप्रा यांच्या प्रेमाबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. ते आपल्या आयुष्यात सुद्धा प्रेम आणि रोमान्सला खूप महत्व देत होते. समोर आलेल्या बातमीनुसार यश चोप्रा हे 60 आणि 70 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री मुमताजच्या प्रेमात होते. मुमताज ही त्या काळातील यशस्वी अभिनेत्री होती. आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने तिने त्या काळात सर्वांना घायाळ केले होते.

यश चोप्रा याच मुमताजच्या प्रेमात पडले होते. मुमताज सुद्धा यश चोप्रा यांच्या प्रेमात पडली होती. इतकेच नव्हेतर दोघे लग्न सुद्धा करणार होते. यश चोप्रा यांनी त्यांच्या ‘आदमी और इंसान’ या चित्रपटात सायरा बानोसोबत मुमताजला घेतले होते. चित्रपटात मुख्य अभिनेत्री सायरा बानो असूनही मुमताजला जास्त काम करण्यास मिळाले होते. या चित्रपटात खास तिच्यासाठी एक गाणेसुद्धा ठेवण्यात आले होते. याच चित्रपटातून मुमताजला खरी ओळख मिळाली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, यश चोप्रा यांचे मोठे बंधु बीआर चोप्रा मुमताजच्या घरी लग्नाची बोलणी करायलासुद्धा गेले होते. मात्र त्याच काळात मुमताजला अभिनयात यश मिळत असल्याने त्यांनी लग्नास नकार दिला. त्यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. पुढे यश चोप्रा यांनी पामेला सिंगसोबत विवाह केला.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा :
नसीरुद्दीन शाह यांची साऊथ चित्रपटांवर घसरली जीभ ; म्हणाले, ‘आरआरआर आणि पुष्पा सारखे चित्रपट मी पाहू शकत नाही’
नसीरुद्दीन शाह यांची साऊथ चित्रपटांवर घसरली जीभ ; म्हणाले, ‘आरआरआर आणि पुष्पा सारखे चित्रपट मी पाहू शकत नाही’

author avatar
Chinmay Remane

हे देखील वाचा