भारताची पहिली बर्लेक्स डान्सर सुक्की मेनन आपल्या दमदार नृत्य शैलीमुळे प्रसिद्ध आहे. बर्लेक्स या नृत्याला भारतात बंदी घालण्यात आली होती. मात्र चार वर्षाच्या न्यायालयीन लढाईनंतर पुन्हा एकदा या नृत्याला मान्यता मिळाली आहे. नक्की काय असतो हा डान्स आणि कोण आहे सुक्की मेनन जाणून घेऊ याबद्दल. बर्लेक्स हा एक असा नृत्य प्रकार आहे, ज्यामध्ये स्टेजवर डान्स करत करत कपडे काढायचे असतात. या डान्स प्रकाराला अनेकांनी अश्लील डान्स आहे असे म्हणत बंदी घालण्याची मागणी केली होती. या नृत्याची कलाकार असणारी सुक्की सिंगापूर ही प्रसिद्ध कलाकार आहे. लवकरच ती हिंदी चित्रपट जगतात देखील प्रवेश करणार आहे.
आपल्या अभिनयाने आणि नृत्याने सर्वांना मोहित करणाऱ्या सुक्की मेननने आपल्या आयुष्यात मोठा संघर्ष केला आहे. तिलाही अनेक सामाजिक रुढी परंपरा यांच्या विरोधाचा सामना करावा लागला होता. तिची आई मल्याळी तर वडिल इंग्रजी होते. अशा दोन वेगवेगळ्या संस्कृतीत वाढल्याने सुक्कीवर तसेच संस्कार झाले. मात्र तिची फॅमिली खूपच जुन्या रुढी आणि परंपरा पाळणारी होती. त्यामुळे या गोष्टींचा सुक्कीला त्रास सहन करावा लागला. तिचे आई वडील दोघेही डॉक्टर असल्यामुळे ती सुद्धा शिक्षण घेऊन नोकरी करायला लागली. मात्र तिचे मन या नोकरीत रमले नाही तिला कलेची आवड असल्याने तिने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर तिने बर्लेक्स नृत्य प्रकारात आपले करिअर करायचे ठरवले त्यासाठी तिने आपल्या पहिल्या ऑडिशनमध्ये मी कुशल बर्लेक्स डान्सर असल्याचे खोटेसुद्धा सांगितले होते.
हेही पाहा-अभिनेता शाहिद कपूरला आहेत ३ आई आणि ३ बाप । Shahid Kapoor Has 3 Mothers And 3 Fathers
या डान्स प्रकाराबद्दल बोलताना सुक्की म्हणते की, “अनेकांना हा डान्स प्रकार अश्लील वाटतो मात्र यामध्ये काहीही अश्लील नाही. यामध्ये आपल्या शरीराचा कलेसाठी वापर करत नृत्य सादर करण्याचे कौशल्य दाखविण्यात येते. मी माझ्या पहिल्या कार्यक्रमात खूप निराश झाले होते मात्र नंतर मला सवय झाली.” असेही तिने सांगितले. आपल्या बॉलिवूडमधील प्रवेशाबद्दल सुक्कीने आनंद व्यक्त करताना सांगितले की, “मला हिंदी चित्रपट खूप आवडतात. आता लवकरच ती भारतात सुद्धा हा डान्स करताना दिसणार आहे.” सुक्कीला तिच्या या कलेसाठी अनेक पुरस्कार मिळाले असून, अनेक नामांकित पुरस्कारांमध्ये नामांकन देखील मिळाले आहे.
हेही वाचा