Saturday, February 22, 2025
Home बॉलीवूड Video | कचऱ्याच्या पिशव्यांसोबत ‘रॅम्पवॉक’, तर डस्टबिनसोबत डान्स! पाहा अदा शर्माची अनोखी ‘अदा’

Video | कचऱ्याच्या पिशव्यांसोबत ‘रॅम्पवॉक’, तर डस्टबिनसोबत डान्स! पाहा अदा शर्माची अनोखी ‘अदा’

‘कमांडो २’ चित्रपटात जोरदार अभिनय करून चर्चेत आलेली अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. अदाचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहेत. अदाला ६० लाखांहून अधिक युजर्स इंस्टाग्रामवर फॉलो करतात. अदाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. या क्रमात तिचा आणखी एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. ज्यामध्ये अदा पूर्णपणे नवीन स्टाईलमध्ये दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये अदा काळ्या रंगाचा मिनी ड्रेस आणि बूट घालून रस्त्याच्या कडेला डान्स करताना दिसत आहे. मात्र यावेळी तिची अनोखी स्टाईल पाहायला मिळाली आहे. अदा हातात कचर्‍याची पिशवी घेऊन रस्त्याच्या कडेला चालत आहे. ज्यावरून ती रॅम्पवॉक करत असल्याचे वाटते. एवढेच नाही, तर कचऱ्याची पिशवी डस्टबीनमध्ये टाकल्यानंतर ती डस्टबिनसोबतही नाचताना दिसत आहे.

अदाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओला इंस्टाग्रामवर खूप पसंती दिली जात आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ एक लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर करत अदाने पोस्टमध्ये लिहिले की, “हा व्हिडिओ अशा व्यक्तीला टॅग करा ज्यांना असे लोकही आवडतात. विनोदबुद्धी असलेल्या मित्रांना हा व्हिडिओ खूपच मजेदार वाटेल.”

अदा शर्माने तिच्या करिअरची सुरुवात २००८ मध्ये केली होती. त्यानंतर तिने विक्रम भट्टच्या ‘१९२०’ चित्रपटात काम केले तेव्हा ती केवळ १६ वर्षांची होती. नंतर हिंदी चित्रपट चालत नसल्याने ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत गेली. आता ती हिंदी आणि साऊथ अशा दोन्ही चित्रपटांमध्ये काम करते. तिने ‘कमांडो २’ आणि ‘कमांडो २’ या दोन्ही चित्रपटात काम केले आहे.

हेही वाचा –

हेही पाहा-

 

हे देखील वाचा