×

अदा शर्माने ब्रिटीश गार्डसमोर केला डान्स; संतप्त युजर्स म्हणाले, ‘तुझ्यासारख्या लोकांमुळेच…’

‘कमांडो’ चित्रपटात जोरदार अभिनय करून चर्चेत आलेली अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. अदाने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामुळे ती आता ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अदा मस्तीच्या मूडमध्ये गुनगुन करताना दिसत आहे. पण चाहत्यांना तिची ही स्टाईल अजिबात आवडली नाही आणि त्यांनी तिला या व्हिडिओसाठी ट्रोल करायला सुरुवात केली. तिचा हा व्हिडिओ जुना असला तरी आता त्याची चर्चा होत आहे.

इंस्टाग्रामवर व्हिडिओ झाला व्हायरल
व्हिडिओमध्ये अदा लंडनच्या विंडसर कॅसलसमोर उभे असलेल्या गार्डसोबत गाताना आणि डान्स करताना दिसत आहे. सिद्धार्थ आणि परिणीती यांच्या ‘हसी तो फसी’ या चित्रपटातील ‘शेक इट लाइक शम्मी’ गाणे गुणगुणताना ती नाचत आहे. तरीही पहारेकरी आहे त्याच स्थितीत उभे असतात. पण अचानक त्यांनी त्यांची स्थिती बदलली की अदा घाबरून जाते.

View this post on Instagram

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)

युजर्स करत आहेत ट्रोल
अदाच्या पोस्टवर अनेक जण तिच्यावर टीका करताना दिसत आहेत. गार्डची खिल्ली उडवणे चाहत्यांना अजिबात आवडले नाही. एकाने अभिनेत्रीला ‘मूर्ख’ म्हटले तर काहींनी ‘बदतमिज’ म्हटले. एका ट्रोलरने लिहिले की, “अशा लोकांमुळेच भारतीयांना मूर्ख समजले जाते.” तर दुसर्‍याने लिहिले, “कामगार लोकांचा आदर केला पाहिजे.”

‘या’ चित्रपटांमध्ये दिसलीय अभिनेत्री
अदा शर्मा हिंदी चित्रपटांसह अनेक तेलुगु चित्रपटांमध्ये दिसली आहे. हिंदी चित्रपटांमध्ये ती ‘कमांडो’, ‘१९२०’ आणि ‘हसी तो फसी’ या चित्रपटांमध्ये दिसली आहे. याशिवाय तिने अनेक वेब सीरिजमध्येही काम केले आहे. तिने ‘द हॉलिडे’ आणि ‘पति पत्नी और वो पंगा’ सारख्या वेब सीरिजमध्येही काम केले आहे.

हेही वाचा :

Latest Post