हिंदी चित्रपट जगतात असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्यात झालेले वाद वर्षानुवर्ष सुरू आहेत. लोकप्रिय कॉमेडीयन कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) आणि अभिनेता गोविंदा (Govinda) यांच्या कुटुंबात अशाच प्रकारचा वाद आहे, जो प्रत्येकाला माहीत आहे. दोन्ही कुटुंबे गेली कित्येक वर्ष एकमेकांशी बोलत नाहीत. या प्रकरणावर आता आरती सिंगने (Aarti Singh) पहिल्यांदाच आपले मत व्यक्त केले आहे.
अभिनेता गोविंदा आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेक यांच्यामधील वाद जगजाहीर आहे. अनेक वर्ष झाली या दोन्ही कुटुंबात कलह सुरू आहे. या सगळ्या प्रकरणावर आता कृष्णा आणि गोविंदाने प्रतिक्रिया देणेही बंद केले आहे. मात्र कृष्णाची बहीण आरती सिंगने या प्रकरणावर आपले मत व्यक्त केले आहे.
कृष्णा आणि गोविंदा वादावर पहिल्यांदाच मत व्यक्त करणारी आरती म्हणते की, “तुम्हाला दुसरा परिवार कधीच मिळणार नाही, तो छोटा आहे तर त्याने माफी मागितली पाहिजे आणि गोविंदा मामानेही मोठ्या मनाने माफ केले पाहिजे. कुटुंब म्हणजे देवाने दिलेली भेट असते. आपण अशा भांडणाने त्याला नाकारू नये. ज्यांच्यासोबत कुटुंब उभे असते ते खूप भाग्यवान असतात.”
याबद्दल पुढे बोलताना आरती म्हणते की, “मी या प्रकरणात कधीही माझे मत व्यक्त केले नाही मात्र आता खूप झाले. आयुष्य खूप छोटे आहे. त्याला आपण अशा मतभेदांमुळे का दूषित करायचे. सगळ्यांनी प्रेमाने राहिले पाहिजे. सगळ्यांचा प्रवास असतो. माझ्याशी सुद्धा कोणी बोलत नाही, मात्र मी कधी याबद्दल कुणाला काही सांगत नाही.”
दरम्यान कृष्णा आणि गोविंदा यांचा बर्याच दिवसापासूनचा हा वाद आहे. दोघेही एकमेकांना बघत सुद्धा नाहीत इतका त्यांच्यात वाद आहे. इतकेच नव्हे तर कृष्णा काम करत असलेल्या कार्यक्रमात गोविंदा प्रमुख पाहुणा म्हणून येणार असला, तर त्या दिवशी कृष्णाचा समावेश नसतो. तो सेटवर सुद्धा येत नाही. याआधी हा वाद प्रसिद्धी मिळविण्यासाठी असल्याचा आरोप करण्यात आला होता. यावर प्रतिक्रिया देताना कृष्णाने, आम्हाला कसलीही प्रसिद्धी नको आहे असे स्पष्टीकरण दिले.
हेही वाचा