Sunday, May 19, 2024

जेव्हा राजकुमार यांनी डान्स करताना उडवली होती गोविंदाची मस्करी, पुढे झाले असे की…

अभिनेते राजकुमार (Rajkumar) हे हिंदी चित्रपट जगतातील लोकप्रिय अभिनेते होते. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने अनेक चित्रपट गाजवले. त्यांच्या चित्रपटांची आजही चर्चा होत असते. आपल्या कठोर वागण्यासाठी प्रसिद्ध असणार्‍या राजकुमार आणि अभिनेता गोविंदा यांच्यातील एक रंजक किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान कलाकार म्हणून अभिनेते राजकुमार यांची ओळख आहे. ते त्यांच्या सक्त आणि कठोर वागण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या या स्वभावाने सगळेच त्यांच्याशी भिऊन राहत असायचे. त्यांनी अभिनय क्षेत्रातील अनेक कलाकारांशी वाद घातले होते त्यामुळे त्यांच्या या स्वभावाचा सगळीकडे दरारा होता. मात्र अभिनेता गोविंदा आणि राजकुमार यांच्यात असा काही किस्सा घडला होता ज्यामुळे गोविंदा अवाक झाला होता. त्याला काय बोलावे हेच सुचायचे बंद झाले होते.

गोविंदा आणि राजकुमार यांनी जंगबाज चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते. दिग्गज अभिनेते राजकुमार यांच्यासोबत गोविंदाचा हा पहिलाच चित्रपट होता त्यामुळे तो थोडा शांतच वाटतं होता. कारण अभिनेते राजकुमार कधी रागावतील आणि कधी काय बोलतील याचा अंदाज कुणालाच लागायचा नाही.
या चित्रपटातील एका गाण्याच्या डान्सवेळी हा किस्सा घडला होता. डान्स करून झाल्यानंतर अभिनेते राजकुमार यांनी गोविंदाला जवळ बोलावले आणि “खूप छान डान्स करतोस,” असे म्हणले. इतक्या मोठ्या कलाकाराने केलेल्या कौतुकाने गोविंदा खूपच भारावून गेला. त्याला पुढे काही बोलायला शब्दच सुचत नव्हते. मात्र यावेळी राजकुमार यांनी फिरकी घेत कधीतरी अभिनेत्रीला पण डान्स करू दे बाबा असा आणखी एक टोला गोविंदाला लगावला ज्यामुळे गोविंदा चांगलाच गोंधळून गेला.

आधिक वाचा-
विसकटलेले केस, अस्वस्थ चेहरा; जान्हवी कपूरचा फोटो पाहून नेटकरी म्हणाले, ‘तुला काय…’
शाहरुख खानची पत्नी गौरी खानने स्वत: कमवलीय कोटींची संपत्ती, ‘या’ कलेत आहे पारंगत

 

हे देखील वाचा