Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

बप्पीदांच्या सोन्याची होणार वाटणी? वारशाने मिळालेल्या सोन्याचे कुटुंबीय करणार तरी काय?

गाण सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाला आठवडाही होत नाही, तोवर प्रसिद्ध गायक बप्पी लहिरी यांच्या मृत्यूच्या बातमीने मनोरंजन क्षेत्रात खळबळ माजली आहे. आपल्या आवाजाने अनेक गाण्यांना सुपरहिट करणार्‍या बप्पी लहिरी यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रातील अनमोल व्यक्तिमत्व हरवले अशीच भावना प्रत्येकजण व्यक्त करत आहे. बप्पी लहिरी यांच्या मृत्यूने त्यांच्याशी संबंधित अनेक किस्से आता समोर येत आहेत. आता बप्पी लहिरी यांचे सोने कोण वापरणार याबद्दलची बातमी समोर आली आहे.

ऐंशी- नव्वदच्या दशकातील लोकप्रिय आवाज म्हणून बप्पी लहिरी (Bappi Lahiri) यांना ओळखले जात होते. आपल्या गाण्यांइतकेच ते त्यांच्या सोने घालून फिरण्याच्या खास स्टाईलमुळेही सर्वत्र चर्चेत होते. म्हणूनच त्यांना गोल्डनमॅन म्हणून ओळखले जात होते. बप्पी यांना लहानपणापासून सोने घालण्याची आवड होती. सोने घालायला लागल्यापासून माझे संगीतातील करियरसुद्धा चमकत आहे, असेही ते म्हणायचे. त्यामुळे ते या सोन्याच्या पेहरावात कायम दिसायचे. समोर आलेल्या बातमीनुसार, बप्पीदा त्यांच्या अंगावरील सोने खूप जपायचे, सुरक्षित ठेवायचे. त्यांच्या मित्रानेही याबद्दल बोलताना सांगितले की, “त्यांचे सोन्याशी खास नाते होते. त्यांनी त्यांची हीच ओळख आणि नाते शेवटपर्यंत जपण्याचा प्रयत्न केला, आणि ते याच पेहरावात कायम आनंदी असायचे.”

त्यांच्या याच मित्राने पुढे बोलताना सांगितले की, “बप्पी दा हिपहॉप आणि आर अँड बी गाण्याचे चाहते होते. ते स्वतःला हॉलिवूडचे गायकच मानत होते. त्यांच्या सारखेच ते हिर्‍यांच्या चैनी घालत होते.” आता बप्पीदांच्या मृत्यूनंतर त्यांच्या या सोन्याचे काय होणार, कोणाकडे जाणार हे जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागली आहे. याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार चैन, अंगठी, कडे, गणपतीची मूर्ती, हिरेजडित ब्रेसलेट असे अनेक दागिने फोटो संग्रही ठेवले होते. आता हे सगळे दागिने बंद कपाटात ठेवले असून त्यांच्या कुटुंबीयांच्या ते ताब्यात असतील.

हेही पाहा- सुपरस्टार्ससोबत काम करणारी आंचल सिंग एका वेबसीरिजमुळे आली चर्चेत। Who Is Anchal Singh

बप्पी लहिरी गेले अनेक दिवस आजारी होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ठीक होऊन ते घरीही गेले होते. मात्र, पुन्हा एकदा त्यांना त्रास जाणवू लागल्याने ते रुग्णालयात दाखल झाले. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूवर संगीत क्षेत्रातील अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा