बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांचे मुंबईतील जुहू येथील क्रिटी केअर रुग्णालयात निधन झाले आहे. बप्पी लाहिरी हे ६९ वर्षांचे होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. बप्पी लहरी यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. अमर संगीत, आशा ओ भालोबाशा, अमर तुमी, अमर प्रेम, मंदिरा, बदनाम, रक्तलेखा, प्रिया या बंगाली चित्रपटांमध्ये हिट गाणी गायली होती. आज आपण या लेखातून जाणून घेऊया बप्पी दा यांच्या जीवनातील काही माहित नसलेल्या गोष्टींबद्दल.
बॉलिवूडमधील गोल्डन मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बप्पी लहिरी यांनी जवळपास ६०० चित्रपटांना संगीत दिले. हिंदी आणि बंगाली भाषासोडून सर्वच भाषणामध्ये त्यांनी गाणी गायली. शिवाय ५००० पेक्षा अधिक गाण्यांना संगीत दिले.
१९८६ साली बप्पी दाने ३३ चित्रपटांमध्ये १८० गाणे रेकॉर्ड केले होते. त्यांच्या या संगीताची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड’ रिकार्ड ‘मध्ये करण्यात आली होती.
ज्या मायकल जॅक्सनच्या डान्सची आणि गाण्याची भुरळ संपूर्ण जगावर होती. तो मायकल जॅक्सन भारतातील बप्पी लहिरी यांच्या ‘डिस्को डान्सर’ या गाण्याचा मोठा फॅन होता.
बप्पी लहिरी यांच्यात संगीताची इतकी मोठी आणि महान प्रतिभा होती की, त्यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षीच तबला शिकायला सुरुवात केली होती. तर ११ व्या वर्षी त्यांनी म्युझिक कंपोज करायला सुरुवात केली.
बप्पी लहिरी हे त्यांच्या गाण्यांसोबत सोन्याच्या दागिन्यांसाठी देखील प्रसिद्ध होते. ते नेहमीच भरपूर सोन्याचे दागिने घालायचे. ती त्यांची एक ओळखच बनली होती. त्यांना त्यांची एक स्टाईल बनवायची असल्याने ते नेहमीच दागिने घालायचे. एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले होते की, ते एका मोठ्या व्यक्तिमत्वाने प्रभावित असल्यामुळे त्यांनी देखील त्यांची एक वेगळी आणि अनोखी स्टाईल बनवायची होती. ते रोजच ७/८ चेन घालायचे, त्यांना असे वाटायचे की, सोने त्यांच्यासाठी लकी होते. म्हणून ते रोजच सोने घालायचे.
किशोर कुमार हे बप्पी लहिरी यांचे नातेवाईक होते. त्यांनी बप्पी लहिरी यांना संगीत शिकवण्यासोबतच बॉलिवूडमध्ये यश मिळवण्यासाठी मदत केली.
भारतीय संगीत क्षेतार्तील बप्पी दा हे असे संगीत दिग्दर्शक होते ज्यांना संगीतात पॉप तडका देण्यासाठी ओळखले जाते. संगीतातील त्यांच्या प्रयोगांनी बॉलिवूडच्या गाण्यांची आणि संगीताची दिशा बदलवली.
बप्पी लहिरी हे नाव तुफान प्रसिद्धी आणि लोकप्रिय झाले आहे. मात्र खूप कमी लोकांना माहित असेल की, बप्पी लहिरी यांचे खरे नाव अलोकेश लाहिड़ी आहे. मात्र नंतर त्यांनी त्यांचे स्टेजचे नाव बदलवले आणि बप्पी लहिरी ठेवले.
बप्पी लहरी यांच्या संगीताची जादू फक्त बॉलिवूडवरच होती असे नाही. त्यांच्या गाण्यांनी हॉलीवूडला देखील वेड लावले होते. ‘डिस्को डान्सर’ सिनेमातील ‘जिमी जिमी आजा आजा’ हे गाणे २००८ साली हॉलिवूडमध्ये आलेल्या ‘यू डोंट मेस विद द जोहान’ चित्रपटात सामील केले होते.
हेही वाचा :
–बिग बींना जया बच्चन यांच्यासोबत जायचे होते लंडनला; वडील हरिवंशराय बच्चन यांना समजल्यावर म्हणाले होते, ‘आधी…’
–टीव्हीवरील साधी- भोळी सून टीना दत्ता बनलीय बोल्ड; टॉपलेस फोटो शेअर करत वाढवला इंटरनेटचा पारा
हे ही पाहा :