Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

तब्बल ७ लाख व्ह्यूज मिळालेला इलियानाचा किसींग व्हिडिओ पाहिला का? होतोय जोरदार व्हायरल

हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत काम करणारी अभिनेत्री इलियाना डिक्रूज सध्या सिनेमात खूपच कमी दिसते. मात्र, असे असले, तरीही ती सोशल मीडियावर सक्रिय राहून चाहत्यांशी संवाद साधत असते. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना आपल्या आयुष्यातील गोष्टींबद्दल सांगत असते. तिने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती एका पपीसोबत खेळत आहे. हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

खरं तर या व्हिडिओत इलियाना (Ileana D’cruz) एका कारमध्ये आपल्या मित्रांसोबत जात आहे आणि तिच्या कुशीत एक क्यूट पपी आहे. पपी तिच्यासोबत खेळत खेळत किस करत आहे. इलियानाने हा सुंदर व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

इलियानाने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “मला नेहमी श्वानाची (कुत्रा) किस आवडते… मग ती कितीही आक्रमक का असेना.” इलियानाचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ७ लाखांहून अधिक व्ह्जूय मिळाले आहेत. तसेच १ लाख लाईक्सही मिळाले आहेत.

इलियानाने यापूर्वी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओही शेअर केला होता. इलियाना या व्हिडिओत लाल रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. यामध्ये ती खूप बोल्ड पोज देताना दिसत आहे. इलियाना कथितरीत्या अविवाहित आहे. ती नेहमी व्यायाम करताना किंवा सुट्टीवर असताना बॉडी फ्लॉन्ट करत सकारात्मक आणि प्रेरणादायी पोस्ट शेअर करते. इलियानाचा हा व्हिडिओ तिच्या मालदीव व्हेकेशनचा आहे.

इलियानाचे तिच्या पार्टनरशी झाले ब्रेकअप
इलियाना डिक्रूजचे २०२० मध्ये तिचा अनेक वर्षांपासून असलेला पार्टनर एँड्र्यू नीबोनसोबत ब्रेकअप झाले होते. याबद्दल तिने सार्वजनिकरीत्या खुलासाही केला होता. इलियाना अनेक वर्षांपासून नीबोनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. इतकेच नाही, तर तिने इंस्टाग्रामवर नीबोनला “आतापर्यंतचा सर्वात चांगला पती,” असे म्हटले होते.

इलियानाला आहे कुटुंब आणि मैत्रीची किंमत
इलियानाने कधीही अधिकृतपणे आपण विवाहित असल्याचे कबूल केलेले नाही. ब्रेकअपचा सामना कसा केला, असे विचारल्यावर इलियाना म्हणाली होती की, “मला त्रास होत नाही. जेव्हा तुम्ही अशा परिस्थितीतून जात असता, तेव्हा तुम्हाला तुमच्या कुटुंबाची आणि मित्रांची किंमत समजते.” माध्यमांना दिलेल्या दुसर्‍या एका मुलाखतीत इलियाना म्हणाली होती की, ती तिचे वैयक्तिक आयुष्य “अत्यंत पवित्र” मानते.

हे देखील वाचा