×

इलियाना डिक्रूजने लाल लेहेंग्यातील फोटोशूट झाले व्हायरल, फोटोमधील ‘या’ गोष्टीने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

बॉलिवूडमधील अभिनेत्री त्यांच्या चित्रपटांसोबतच त्यांच्या फॅशन स्टेटमेंटमुळे आणि त्यांच्या हटके, अतरंगी फॅशनमुळे सतत मीडियामध्ये प्रकाशझोतात येतात. अभिनेत्रीची फॅशन म्हणजे मीडियामध्ये आणि सोशल मीडियावर तुफान चर्चेचा विषय देखील असतो. अभिनेत्रींच्या काही फॅशन तरुणींमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होताना देखील दिसतात. बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवणारी अभिनेत्री इलियाना डिक्रूज (Ileana D’Cruz) देखील सध्या तिच्या एका हटके फोटोशूटमुळे इंटरनेटवर तुफान गाजताना दिसत आहे. आपल्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असणारी इलियाना पुन्हा एकदा तिच्या हटके फॅशनमुळे चर्चेत आली आहे.

इलियानाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचा एक सुंदर मात्र अतिशय हटके फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमुळे इलियाना खूपच प्रकाशझोतात आली असून, तिच्या लुकपेक्षा जास्त तिच्या शूजची जास्त चर्चा आता इंटरनेटवर सुरु झाली आहे. या फोटोमध्ये इलियाना डिक्रूजने (Ileana D’Cruz) भडक लाल रंगाचा लेहेंगा घातला असून, ती बाईकवर बसलेली दिसत आहे. इलियानाचा हा लूक नववधू सारखा आहे. यात तिने कानात मोठे झुमके, नाकात नथ, भडक लाल रंगाची लिपस्टिक, गळ्यात नाजूक चैन आणि पेंडंट घातले असून यावर तिने सटल मेकअप केला आहे. तिचे खुले केस तिचा लूक पूर्ण करताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Ileana D'Cruz (@ileana_official)

इलियाना (Ileana D’Cruz) चा हा लूक नववधू सारखा दिसत असून, दुसरीकडे तिच्या पायातवर सर्व बघणाऱ्यांचे लक्ष टिकले आहे. नववधूचं या पोशाखावर इलियानाने कोणत्याही स्टायलिश आकर्षक सॅंडल, चप्पल घातली नसून तिने चक्क पायात शूज घातले आहे. इलियानाने काळ्या रंगाचे हाई हिल्स बूट्स घातले असून, ते कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट दिसत आहे. बाईकवर बसलेल्या इलियानाने तिच्या लेहेंग्यावर दुपट्टा न घेता त्याला बाजूला ठेवले आहे.

इलियाना सोशल मीडियावर तुफान सक्रिय असून, ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. ती तिच्या खऱ्या आयुष्यात अतिशय बोल्ड आहे. अनेकदा ती तिचे बोल्ड फोटो देखील शेअर करत असते. इलियाना शेवटची अभिषेक बच्चनच्या ‘द बिग बुल’मध्ये दिसली होती. आगामी काळात ती ‘अनफेयर एंड लवली’ (Unfair And Lovely) मध्ये रणदीप हुडासोबत दिसणार आहे. याशिवाय ती विद्या बालन, प्रतीक गांधी यांच्यासोबत एका कॉमेडी सिनेमातही दिसणार आहे.

हेही वाचा :

Latest Post