Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना आणि सुपरस्टार विजय देवरकोंडा करणार का लग्न? जाणून घ्या सत्य

‘पुष्पा’ चित्रपटात श्रीवल्लीची भूमिका साकारून चर्चेत उतरलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना होय. या चित्रपटात रश्मिकाने तिच्या गोंडसपणाने सर्वांची मने जिंकली आहेत. रश्मिकाचे गोंडस दिसणे आणि तिचे स्मितहास्य हे वेड लावणारे आहे. रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांची जोडी ऑनस्क्रीन सुपरहिट ठरली आहे. दोघांची जोडी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पसंत केली जाते. ‘डिअर कॉम्रेड’, ‘गीता गोविंदम’ या चित्रपटात ही ताकदवान जोडी आपण पाहिली आहे. पण आता त्यांच्या लग्नाच्या बातम्या येत आहेत. या वर्षी दोघे जीवनाचे साथीदार होऊ शकतात, असे बोलले जात आहे.

‘पुष्पा’ चित्रपटात जोरदार अभिनय दाखवल्यानंतर एका मुलाखतीत रश्मिकाने (Rashmika Mandanna) तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगितले. तिने विजयसोबतच्या लग्नाच्या गोष्टीही सांगितल्या. रश्मिका आणि विजय (Vijay Devarakonda) अनेकदा एकत्र दिसले आहेत. पण दोघेही एकमेकांना फक्त खास मित्र म्हणून संबोधतात. दोघेही अनेकवेळा डेटवर स्पॉट झाले होते. दोघेही एकत्र सुट्टी साजरे करताना दिसले आहेत. या सगळ्या गोष्टी असूनही दोघांनीही प्रेमाची गोष्ट कधीच स्वीकारलेली नाही. पण लग्नावर काय बोलले ते पाहा.

Photo Courtesy: Instagram/rashmika_mandanna, thedeverakonda

माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत रश्मिकाने सांगितले की, ती लग्नाचा विचार करत नाहीये. लग्नासारख्या गोष्टींसाठी ती अजून लहान आहे. या गुबगुबीत गोष्टींमधून रश्मिकाने लग्नाचे प्रकरण पुढे ढकलले आहे. पण दोघेही मुंबईला शिफ्ट झाल्याचही वृतांमधून समजल आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर विजय देवरकोंडा त्याच्या पहिल्या चित्रपट ‘लायगर’ च्या शूटिंगसाठी मुंबईत व्यस्त आहे. ‘पुष्पा’ चित्रपटासोबत एका रात्रीत स्टार बनलेली रश्मिका सर्वांच्या मनावर राज्य करत आहे आणि लवकरच साऊथ सिनेसृष्टीतील हा चेहरा बॉलिवूडमध्येही दमदार एन्ट्री करणार आहे. रश्मिका लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू’ या चित्रपटात दिसणार आहे. आता हे दोघे किती दिवसात त्यांच्या लग्नाची घोषणा करतात हे पाहणेे महत्त्वााचे ठरणार आहे.

हेही वाचा –

बुरखा घालून चित्रपट पाहायला गेलेल्या माधुरी दीक्षितला ‘या’ कारणामुळे अर्धवट चित्रपट सोडत काढावा लागला होता पळ

हे देखील वाचा