×

ओपन श्रगमधील उर्फी जावेदच्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांना घातली भुरळ, चाहते म्हणाले ‘तू युनिक आहेस’

बिग बॉस ओटीटीमध्ये दिसलेली अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या जबरदस्त फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. उर्फी सतत तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आजकाल ती तिच्या अभिनयासाठी कमी आणि तिच्या विचित्र कपड्यांसाठी जास्त ओळखली जाते. ती कुठेही जाते, जे काही करते ते सर्व पॅपराझीच्या कॅमेऱ्यात कैद होते. चाहत्यांना कसे प्रभावित करायचे हे उर्फीला चांगलेच ठाऊक आहे. सतत आपल्या नवनव्या लूकने दहशत निर्माण करणाऱ्या उर्फीने आता तिचा नवा लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. उर्फीने (Urfi Javed) तिच्या इंस्टाग्राम हँडलवर हलक्या निळ्या आणि पांढर्‍या ड्रेसमधील तिचे काही सुपर सिझलिंग फोटो चाहत्यांसह शेअर केले आहेत. ओपन श्रग आणि शॉर्ट स्कर्टमधील फोटोंमध्ये उर्फी कमालीची सुंदर दिसत आहे. तिचा श्रग समोरून पूर्णपणे उघडा आहे, जो तिने नाडीच्या मदतीने बांधला आहे.

या ट्रेंडी आणि स्टायलिश लूकसह उर्फीने मोठे कानातले घातले आहेत. अभिनेत्रीने तिच्या डोळ्यात लेन्स देखील लावल्या आहेत, ज्यामुळे तिचा लूक खूपच आकर्षक दिसत आहे. उर्फीच्या मेकअपबद्दल सांगायचे झाले, तर तिला न्यूड मेकअपची किती आवड आहे हे आतापर्यंत सर्वांनाच माहित आहे. या मादक पोशाखातही तिने न्यूड ग्लॉसी लिपस्टिक लावली आहे आणि तिचा मेकअप साधा ठेवला आहे. अभिनेत्रीने मस्करा आणि आयलायनरने तिच्या डोळ्यांना खास लूक दिला आहे.

https://www.instagram.com/p/CaOwIJevbce/?utm_source=ig_web_copy_link

ओपन श्रग आणि स्कर्टमध्ये उर्फी सोफ्यावर पोझ देताना दिसत आहे. प्रत्येक फोटोत अभिनेत्रीची पोझ आणि तिचे एक्सप्रेशन इतके किलर आहेत की, पाहणाऱ्यांच्या हृदायचे ठोके आणखी जोरात वाढतील. उर्फी या लूकने चाहत्यांमध्ये आग लावताना दिसत आहे. या अभिनेत्रीचे फोटो समोर येताच सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. अभिनेत्रीचा हा लूक पाहून चाहते फिदा होत आहेत.

तासाभरात हजारो युजर्सने उर्फीच्या फोटोंना लाईक केले असून, त्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. उर्फीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला असला तरी यावेळी चाहत्यांना तिचा लूक खूपच आवडला आहे. एका युजरने लिहिले की, “सुंदर आणि गॉर्जियस.” आणखी एका युजरने ‘वाह’ लिहिले. दुसऱ्या युजरने लिहिले की, “काहीही म्हण पण तू युनिक आहेस.” नेहमीच ट्रोलिंगचा सामना करणाऱ्या उर्फीच्या गॉर्जियस लूकने यावेळी चाहत्यांची मने जिंकली आहेत असेच म्हणावे लागेल. उर्फी खरोखर मादक आणि जबरदस्त दिसत आहे. तिची अदा कोणालाही घायाळ करण्यासाठी पुरेशी आहे.

हेही वाचा-

Latest Post