Tuesday, January 20, 2026
Home बॉलीवूड रशिया- युक्रेन युद्धातून थोडक्यात वाचली उर्वशी रौतेला, बऱ्याच दिवसांपासून चालू होती शूटिंग

रशिया- युक्रेन युद्धातून थोडक्यात वाचली उर्वशी रौतेला, बऱ्याच दिवसांपासून चालू होती शूटिंग

जगभरात सध्या युक्रेन आणि रशियामधील सुरू झालेल्या युद्धाची जोरदार चर्चा सुरू आहे. रशियाने सुरुवातीला सायबर हल्ला चढवत युक्रेनला लक्ष्य केले होते. मात्र आता रशियाने थेट बॉम्ब हल्ला करत युक्रेन मध्ये खळबळ माजवली आहे. युक्रेनचे नागरिक सध्या जीव मुठीत धरून राहत असून, हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) सुद्धा या हल्ल्यातून थोडक्यात वाचली आहे. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ.

रशिया आणि युक्रेनमध्ये सध्या जोरदार युद्ध सुरू झाले आहे. रशियाने युक्रेनवर बॉम्ब हल्ला केला आहे, ज्यामध्ये अनेक निष्पाप युक्रेन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या युक्रेनमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. याच गोंधळात अभिनेत्री उर्वशी रौतेलासुद्धा युक्रेनमध्ये होती. मात्र तिने पटकन निर्णय घेत मायदेशी परतण्याचा निर्णय घेतल्याने ती या संकटातून वाचली आहे.

सध्या अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या कुटुंबासमवेत मालदीवमध्ये सुट्टीची मजा घेताना दिसत आहे. मात्र दोनच दिवसांपूर्वी ती युक्रेनमध्येच आपल्या चित्रपटाचे शूटिंग करण्यात व्यस्त होती. या संपूर्ण युद्धाच्या दोन दिवस आधीच ती युक्रेनमध्ये तिच्या ‘द लेजेंड’ चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. ज्याचा व्हिडिओसुद्धा तिने सोशल मीडियावर शेअर केला होता, मात्र सुदैवाने तिने लवकर देश सोडण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे तिच्यावरील मोठे संकट टळले आहे. या चित्रपटातून उर्वशी दाक्षिणात्य चित्रपट क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

उर्वशीच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये ती युक्रेन मधील रस्त्यांवर फेरफटका मारताना दिसत आहे. सोबतच शाहरुख खानच्या ‘जब तक है जान’ चित्रपटाचे गाणे वाजत आहे. दरम्यान अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. यावरून ती अनेक फोटो आपल्या चाहत्यांशी शेअर करत असते. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. उर्वशी याआधी क्रिकेटपटू रिषभ पंतसोबतच्या प्रेम प्रकरणामुळे चर्चेत आली होती. मात्र याबाबत दोघांनीही कधीच स्पष्टीकरण दिले नव्हते .

हेही वाचा – 

हे देखील वाचा