×

‘या’ गोष्टीला लव्ह बाईट म्हणणाऱ्या युजर्सवर उर्वशी रौतेला संतापली, म्हणाली ‘फेक न्यूज पसरवण्याऐवजी….’

बॉलिवूडची हॉट आणि सुंदर अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ चात्यांबरोबर शेअर करत असते. बॉलिवूडसोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपला ठसा उमटवणाऱ्या उर्वशीने आज यशाचे शिखर गाठले आहे. आपल्या मेहनती आणि समर्पणामुळे या अभिनेत्रीने देशातच नाही, तर परदेशातही खूप नाव कमावले आहे. यामुळेच या अभिनेत्रीने अल्पावधीतच चाहत्यांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे. चित्रपटांसोबतच इंटरनेटच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांशी सतत जोडलेली असते.

उर्वशीचे (Urvashi Rautela) फोटो आणि व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडतात आणि ते त्यांची आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान, नुकतीच अभिनेत्री विमानतळावर स्पॉट झाली. यादरम्यान अभिनेत्रीच्या मानेवर लाल रंगाची खूण दिसून आली. अभिनेत्रीच्या गळ्यावर दिसणारी ही खूण लव्ह बाइट म्हणून ओळखली जात आहे. ही बातमी सोशल मीडियावर आगीसारखी पसरत आहे. विमानतळावर यावेळी अभिनेत्रीने सिक्विन लाल टॉप आणि काळा मिनी स्कर्ट परिधान केलेला दिसला. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती. मात्र, यादरम्यान काहींचे लक्ष अभिनेत्रीच्या गळ्यावर गेले. अशा परिस्थितीत आता अभिनेत्रीने या बातम्यांवर प्रतिक्रिया देत सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला आहे.

ट्विटरवर अभिनेत्रीने लिहिले की, “बकवास, ही माझी लाल लिपस्टिक आहे, जी माझ्या मास्कमुळे पसरली आहे. लाल लिपस्टिक हाताळणे किती कठीण आहे हे कोणत्याही मुलीला विचारा. कोणाची तरी प्रतिमा डागाळण्यासाठी लोक काहीही लिहू शकतात यावर विश्वास बसत नाही. विशेषतः मुलींच्या बाबतीत. तुमच्या फायद्यासाठी खोट्या बातम्या पसरवण्याऐवजी तुम्ही माझ्या यशाबद्दल का लिहीत नाही.”

कामाच्या आघाडीवर, अभिनेत्री लवकरच जिओस्टुडिओच्या वेबसाइट इन्स्पेक्टर अभिनाशमध्ये रणदीप हुड्डासोबत दिसणार आहे. याशिवाय नुकत्याच झालेल्या मिस युनिव्हर्स २०२१ स्पर्धेतही ही अभिनेत्री परीक्षक म्हणून दिसली होती. विशेष म्हणजे या फॅशन वीकमध्ये दोनदा जाणारी उर्वशी पहिली भारतीय ठरली आहे, ही देशासाठी अभिमानाची बाब आहे.

हेही वाचा –

बुरखा घालून चित्रपट पाहायला गेलेल्या माधुरी दीक्षितला ‘या’ कारणामुळे अर्धवट चित्रपट सोडत काढावा लागला होता पळ

Latest Post