हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक अभिनेते आहेत जे आपल्या पिळदार शरीर यष्टीसाठी आणि देखण्या लूक साठी प्रसिद्ध असतात. या अभिनेत्यांची बॉडी आणि लूकची नेहमीच चर्चा होताना दिसते. यामध्ये अभिनेता टायगर श्रॉफचे (Tiger Shroff) नाव प्रामुख्याने घेतले जाते. अभिनेता टायगर श्रॉफच्या फिटनेस आणि बॉडीचे अनेक चाहते आहेत. मात्र अभिनेता टायगर श्रॉफने एका मुलाखतीत बोलताना सांगितलेला किस्सा ऐकून तुम्हीही चकित व्हाल. काय आहे हा किस्सा चला जाणून घेऊ.
टायगर श्रॉफ हा हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. टायगरच्या प्रत्येक भूमिकेत त्याची बॉडी आणि फायटिंग सीनचे कौतुक झालेले पाहायला मिळते. तरुणाईला त्याच्या बॉडीचे आणि दमदार लूकचे नेहमीच आकर्षण वाटत असते. मात्र तुम्हाला ऐकून धक्का बसेल की, अभिनेता टायगर श्रॉफला आजही अंधाराची आणि एकटे झोपायची भीती वाटते. म्हणूनच तो आजही त्याच्या आई शेजारी झोपतो. याबद्दलचा खुलासा खुद्द अभिनेता टायगर श्रॉफने केला होता.
टायगर श्रॉफने एका मुलाखतीत आपल्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले होते. यावेळी त्याने सांगितले की, भितीदायक किंवा भुताचे चित्रपट पाहिल्यानंतर त्याला इतकी भीती वाटते की, तो एकटा झोपू शकत नाही. यावेळी बोलताना तो म्हणाला की, “मी घराबाहेर किंवा प्रवासात असतो तेव्हा माझ्यासोबत कोणालातरी थांबवून घेतो आणि जेव्हा घरी असतो तेव्हा मी आईपाशी झोपतो.” टायगर श्रॉफच्या या खुलाशाने प्रत्येकजण चकित झाल्याचे पाहायला मिळाले होते.
दरम्यान टायगर श्रॉफ आपल्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. आगामी काळात तो ‘गणपत’ या चित्रपटात झळकणार आहे. ज्यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) काम करताना दिसणार आहे. याआधी टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूरचा ‘बागी ३’ चित्रपट चांगलाच गाजला होता. चित्रपटातील टायगर श्रॉफच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक करण्यात आले होते.
हेही वाचा –