Tuesday, August 5, 2025
Home बॉलीवूड चित्रांगदा सिंगचा फ्लाईटमधील एयरहोस्टेजेसवर फुटला राग म्हणाली, ‘यांना थोडा आदर शिकवा’

चित्रांगदा सिंगचा फ्लाईटमधील एयरहोस्टेजेसवर फुटला राग म्हणाली, ‘यांना थोडा आदर शिकवा’

अनेकदा कलाकार आणि त्यांचे वाद आपण बघत असतो, ऐकत असतो. विमान प्रवासादरम्यान देखील अनेक कलाकरांना वेगवेगळे अनुभव येत असतो. असाच एक विचित्र अनुभव अभिनेत्री चित्रांगदा सिंगला (Chitrangda Singh) आला आहे. चित्रांगदाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एका फ्लाईटमधील सदस्यांनी तिच्यासोबत केलेल्या गैरवर्तवणुकीचा अनुभव शेअर केला आहे. चित्रांगदाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ क्लिप देखील शेअर करत एक नोट लिहिली आहे. या पोस्टमधून तिने तिच्यासोबत झालेल्या चुकीच्या वर्तनाची तक्रार देखील केली आहे.

Photo Courtesy Instagramchitrangda

 

चित्रांगदाने व्हिडिओ शेअर करत लिहिले, “गो एयरची दिल्लीहून मुंबईला जाणारी फ्लाईट ३९१ मध्ये आतापर्यंतच्या सर्वात खराब आणि तोंडाळ एयरहोस्टेजेस आहे. कृपया तुम्ही त्यांना थोडा आदर शिकवा. एवढा जास्त गर्विष्ठपणा मी आजपर्यंत नाही पाहिला. या सर्वांमुळे खूपच निराशा झाली आहे. यावरून मला एयर इंडियाचा सर्वात घाणेरडा अनुभव आठवला आहे.” पुढे चित्रांगदाने लिहिले, “ही घटना माझ्यासोबत नाही तर माझ्याशेजारी बसलेल्या व्यक्तीसोबत झाली. त्या व्यक्तीसोबत एयरहोस्टेजने खूपच चुकीचे वर्तन केले. मात्र त्या व्यक्तीने त्यांच्यासोबतच खूपच चांगले वर्तन केले होते. करू मेंबर्सला असे रागाने बोलणे योग्य वाटत नाही.”

तसे पाहिले तर गो एयरबद्दल ही पहिली तक्रार नाही. नुकत्याच काही दिवसांपूर्वी अभिनेता आर्य बब्बरने देखील अशाच एका घटनेचा व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात आर्य गो एयरने प्रवास करत होता आणि त्याचे पायलटसोबत भांडण झाले.

चित्रांगदाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, तिने २००३ साली सुधीर मिश्रा यांच्या ‘हजारों ख्वाहिशें ऐसी’ या सिनेमातून के के मेननसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती ‘ये साली जिंदगी’, ‘देसी बॉयज’, ‘इनकार’, ‘बाजार’ आदी चित्रपटांमध्ये दिसली. काही दिवसांपूर्वी तिचा अभिषेक बच्चनसोबतचा ‘बॉब बिस्वास’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. लवकरच ती सारा अली खान आणि विक्रांत मेस्सीसोबतच ‘गॅसलाइट’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा